आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस हवामान करार जगासाठी ठरेल निर्णायक टप्पा : बराक आेबामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पॅरिस हवामान बदल करार येत्या ३० दिवसांत अंमलात येईल. हा जगासाठी निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी मांडले. पुढच्या पिढीसाठी पृथ्वी राहण्यायोग्य जागा बनवण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण आहे. ५ ऑक्टोबर ही तारीख एका ऐतिहासिक कराराची तारीख असल्याचे मत आेबामांनी व्यक्त केले. जगातील सर्व राष्ट्रांनी सहमती दिलेल्या या करारातील तरतुदींची अंमलबजावणी झाली तर पुढच्या अनेक पिढ्या या कराराचे स्मरण करतील, असे आेबामा म्हणाले. व्हाइट हाऊस येथे झालेल्या एका समारंभात ते बोलत होते.

केवळ पॅरिस करारामुळे हवामान बदलाच्या समस्येशी निपटणे शक्य नाही. या करारात असलेल्या प्रत्येक तरतुदीच्या अंमलबजावणीत प्रत्येक देशाचे योगदान असेल तरच याची उद्दिष्टे साध्य होतील. याची अंमलबजावणी तत्काळ सुरू होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पारदर्शकता असण्यावर भर : प्रत्येक देशात कार्बन उत्सर्जन किती प्रमाणात होते याचे विश्लेषण करण्याची परवानगी असली पाहिजे. मूल्यमापनात पारदर्शकता आली तरच हवामान बदलाच्या समस्येशी निपटता येईल.

४ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी : पॅरिस हवामान बदल करार ४ नोव्हेंबरपासून अंमलात येणार असल्याचे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी म्हटले आहे. पॅरिस कराराच्या अंमलबजावणीला २ ऑक्टोबर रोजी भारताने सहमती दिली. ५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रिया, बोलिव्हिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, माल्टा, नेपाळ, पोर्तुगाल, स्लाेव्हाकिया या देशांनीही कराराला मंजुरी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...