आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: स्फोटांनी हदरले पॅरिस, रस्त्यांवर पसरले मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसच्या रस्त्यांवर मृतदेह पडले आहेत. - Divya Marathi
पॅरिसच्या रस्त्यांवर मृतदेह पडले आहेत.
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिस शुक्रवारच्या रात्री साखळी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने हदरली. पॅरिसमध्ये विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यात 155 लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. पॅरिसमधील फुटबॉल स्टेडियममध्ये फ्रान्स-जर्मनी यांच्या मैत्रिपूर्ण सामना सुरु असताना स्फोट झाला. स्टेडियम बाहेर झालेल्या स्फोटाची तीव्रता एवढी होती की आवाजाने आतील प्रेक्षक घाबरले. त्यानंतर खेळ बंद करण्यात आला आणि सर्वजण मैदानावर जमा झाले.
पोलिसांच्या माहितीनूसार, मशिनगन आणि एके-47 ने सज्ज दहशतवाद्यांनी बाटाक्लान नावाच्या थिएटरमध्ये शेकडो लोकांना ओलिस ठेवले होते. नंतर त्यांची सामूहिक हत्या करण्यात आली. सात ठिकाणी झालेल्या हल्ल्यांनतर पॅरिसमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून 1500 मिलिटरी जवान तैनात करण्यात आले. संपूर्ण फ्रान्समध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. येथून होणारी उड्डाणे आणि मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, ट्विटरवर 'फ्रायडे 13' ट्रेंड करत आहे