आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Terrorists Shouted \'Allah Akbar\' And \'this Is For Syria\' Says Witnesses

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते राष्ट्रपती, राष्ट्रगीत गाऊन एकात्मतेचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटांचे आवाज कानावर आले. त्यानंतर लोक मैदानात एकत्र जमले. फ्रान्सच्या एकात्मतेचे दर्शन घडवत सर्वांनी एकासूरात राष्ट्रगीत ‘La Marseillaise’ गायले आणि त्यानंतर सर्व बाहेर पडले. - Divya Marathi
स्फोटांचे आवाज कानावर आले. त्यानंतर लोक मैदानात एकत्र जमले. फ्रान्सच्या एकात्मतेचे दर्शन घडवत सर्वांनी एकासूरात राष्ट्रगीत ‘La Marseillaise’ गायले आणि त्यानंतर सर्व बाहेर पडले.
पॅरिस - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. हल्ला झाला तेव्हा नॅशनल स्टेडियममध्ये फुटबॉल सामना सुरु होता. याचवेळी स्फोटांचे आवाज कानावर आले. त्यानंतर लोक मैदानात एकत्र जमले. फ्रान्सच्या एकात्मतेचे दर्शन घडवत सर्वांनी एकासूरात राष्ट्रगीत ‘La Marseillaise’ गायले आणि त्यानंतर सर्व बाहेर पडले.
पॅरिस हल्ल्यात आतापर्यंत 155 लोक मारले गेले. स्थानिक माध्यमांचा दावा आहे, की पॅरिस नॅशनल स्टेडियमबाहेर झालेल्या हल्ल्याचा उद्देश राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांना ठार मारण्याचा होता.
सीरियाचा बदला घेण्याच्या उद्देशाने हल्ला
दहशतवाद्यांनी पॅरिसमधील बाटाक्लान थिएटरमध्ये 100 जणांना ओलिस ठेवले आणि त्यांची हत्या केली. थिएटरमधील एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला, की दहशतवादी सीरियाचा हा बदला असल्याचे म्हणत होते. काही तर अल्लाह-हो-अकबरच्या घोषणा देत बेछूट गोळीबार करत असल्याचा दावा त्यांनी केला. वास्तविक अजून हल्ला कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही.
काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी
1 - टेबलखाली डोके खुपसून वाचवला जीव
दहशतवाद्यांकडून पॅरिसच्या रेस्तराँमध्ये गोळीबार करण्यात आला. येथेही अनेक लोक मारले गेले. येथे हजर असलेल्या बेन ग्रँट नावाच्या व्यक्तीने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सांगितले, दहशतवादी सगळीकडे गोळीबार करत होते. लोक जीव वाचवण्यासाठी सुरक्षीत जागा शोधत होते. काही रेस्तराँमधील टेबलखाली डोके खुपसून बसले. माझ्यासमोरच दहशतवाद्यांनी सात-आठ जणांना ठार मारले. काही दहशतवादी कारमध्ये बसूनच रेस्तराँवर गोळीबार करत होते. मी पाहात होतो, एका गोळीचा आवाज झाल्यानंतर इकडे एक-एक माणूस जमीनीवर कोसळत होता.
2 - फ्रान्स जर्मनी दरम्यान सुरु असलेल्या फुटबॉल सामन्यावेळी स्फोट
पॅरिसमधील नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये फ्रान्स-जर्मनी दरम्यान फुटबॉलचा मैत्रिपूर्ण सामना सुरु होता. या स्टेडियम बाहेर स्फोट झाला. तेव्हा लोकांना वाटले की फटाके फुटत असतील. फुटबॉल सामना पाहात असलेल्या जॉर्ज डोमिनीने एका वेबसाइटसोबत केलेल्या बातचितमध्ये सांगितले, सामना सुरु असताना हल्ला झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे लोक सैरावैरा धावू लागले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कुठे-कुठे झाला हल्ला