आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात प्रवाशाच्या डोक्यावर फोडली फ्लाइट अटेंडंटने बाटली, उड्डाणादरम्यान दार उघडण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिएटल- अमेरिकेतील सिएटलहून बीजिंगला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानातील एका प्रवाशाने उड्डाणादरम्यान दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यावर फ्लाइट अटेंडंटने त्याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. त्यानंतरही हा प्रवासी बेशुद्ध पडला नाही. सदर प्रवाशाने इतर प्रवाशांसोबत तसेच कर्मचाऱ्यांसोबत भांडणही केले होते.  
 
फ्लोरिडामध्ये टॅम्पा येथील २३ वर्षीय आरोपी जोसेफ डॅनियल हुडेकला गुरुवारी अटक केली होती. हुडेकने उड्डाणापूर्वी फ्लाइट अटेंडंट यांच्याकडे बियरची मागणी केली. हे विमान व्हँकुवर बेटावरून पश्चिममध्ये प्रशांत महासागरावर होते. हुडेक प्रवाशांसोबत संघर्षही करत होता. त्यानंतर हुडेकने विमानाचे दार उघडण्याचाही प्रयत्न केला. हुडेकला नियंत्रणात आणण्यासाठी फ्लाइट अटेंडंटने त्याच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली. त्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. सुरूवातीला काय घडले, हे समजले नाही.

विमानतळावरील पोलिस म्हणाले, जोसेफ यांच्यावर फ्लाइट अटेंडंटशी भांडण केल्याचाही आरोप आहे. त्यात ते दोषी आढळून आल्यास त्यांना किमान २० वर्षांपर्यंतची कैद आणि अडीच लाख डॉलरच्या दंडाची तरतूद आहे. या प्रकरणाची लवकरच सुनावणी होणार आहे.  
बातम्या आणखी आहेत...