आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर पटेलांचा बहिष्कार; बैठकीत झाला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एडिसन(न्यूजर्सी) / दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यास हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी नकार दिला आहे. यासोबत त्यांनी मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मोदी या महिन्याच्या अखेरीस अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
पटेल(पाटीदार) समाजाच्या जवळपास एक हजार नागरिकांनी मंगळवारी न्यूजर्सीच्या एडिसन शहरात बैठक घेतली. यामध्ये पटेलांसाठी नोकऱ्यांत आरक्षणाची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी सरकारवर दबाव टाकण्याचा इशाराही देण्यात आला. त्यांनी भारतातील पटेल समुदायाशी बांधिलकी दाखवली. न्यूजर्सीमध्ये पटेल समाजाच्या नागिरकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये बहुतांश व्यावसायिक आहेत. आरक्षण आंदोलनाशी संबंधित सरदार पटेल गटाचे अध्यक्ष लालजी पटेल म्हणाले, मोदी सरकारने पटेलांच्या आरक्षणासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार केला जाईल.