आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Attack Pak Ay Make Masood Available To India For Questioning

पठाणकोट हल्ला: PAK ने म्हटले, भारत करू शकतो मसूद अझहरची चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीवरून पाकिस्तानने मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे, हल्ल्याचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहर याची चौकशी भारतही करू शकतो, असे नवाझ शरीफ यांचे परराष्ट्रीय संरक्षण सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. मात्र, त्याआधी पाकिस्तान मसूदची चौकशी करेल, असेही अजीज यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, अजीज यांचे वक्तव्य आउटडेटेड असल्याची टीका मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. दरम्यान, 1999 मध्ये कंधार प्लेन हायजॅक प्रकरणी भारताने प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात मसूद अझहरची मुक्तता केली होती.

आणखी काय म्हणाले सरताज अजीज?
- वॉशिंग्टनमध्ये पोहोचले सरताज अजीज यांनी डिफेन्स राइटर्स ग्रुपशी पठाणकोटमधील एअरबेसवर झालेल्या कथित दहशतवादी हल्ल्यावर चर्चा केली. पाकिस्तानात हल्ल्याची चौकशी सुरु आहे. भारताने मसूद अझहरला या हल्लाचा मास्टर माइंड म्हटले आहे. मसूद दोषी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अजीज यांनी सांगितले.
- पाकिस्ताननातील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरविरुद्ध कारवाई करेल? तसेच त्याला भारताकडे चौकशीसाठी सोपवेल? असे दोन प्रश्न अजीज यांना विचारण्यात आले होते.
- ‘पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तानची भारताला सहकार्याची भूमिका घेतली आहे. नवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदींना फोन करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.
- भारताकडून मिळालेल्या पुराव्यावर देखील कार्यवाही केली आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. काहींना नजरकैद करण्‍यात आल्याचे अजीज यांनी सांगितले.

मनोहर पर्रिकर म्हणाले पाकचे वक्तव्य 'आउटडेटेड'
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्रीय सल्लागारांचे वक्तव्य आउटडेटेड असल्याचे भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा....
@अजीत डोभाल यांचाही जबाब नोंदवू शकते PAK ची SIT
@पाकने एफआयआरमधून वगळले म्होरक्याचे नाव
@पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझहर फरार
@NIAच्या हाती ठोस पुरावे, अझहरच्या अटकेसाठी भारत UN मध्ये जाणार