आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेलच्या संरक्षणासाठी ‘जेम्स बाँड’चा पुढाकार; प्रजातीवर नामशेष होण्याचे संकट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- जेम्स बाँडचा अजरामर हेर रंगवणारा हॉलीवूड स्टार पियर्स बॉस्ननने व्हेल मासे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अलीकडेच तो व्हेलच्या संरक्षणासाठी जनजागृती अभियानात सक्रिय झाला आहे. व्हेल मासा नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

व्हेलच्या संरक्षणासाठी नागरिकांनी आपली शक्ती वापरलीच पाहिजे, असे आवाहन ब्रॉस्ननने केले आहे. ‘टाइम’मध्ये लिहिलेल्या लेखात त्याने पर्यावरणावर संरक्षणासंबंधीची चिंता व्यक्त केली आहे. आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत. व्हेल माशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. सन १९७० मध्ये व्हेल च्या संरक्षणासाठी प्रयत्न झाले होते. हे प्रयत्न पुरेसे आहेत, असे अनेकांना वाटते. परंतु व्हेल प्रजाती अत्यंत वाईट स्थितीमध्ये आहे.

प्रत्येकाने परिवर्तनाचे दूत बनण्याची गरज
>आपण सर्व निसर्गातील परिवर्तनाचे दूत आहोत. त्यामुळेच आपण भविष्याचे अभियंतेदेखील आहोत. प्रत्येक क्षणाला, दिवसाला नवा आकार देऊ शकतो. म्हणूनच अशा प्रजातींचे संरक्षण करणेही कर्तव्य आहे. त्यामधून नव्या भविष्याचा शोध घेता येऊ शकेल.
- पियर्स ब्रॉस्नन, अभिनेता, हॉलीवूड

तत्काळ कृतीची गरज
व्हेलप्रजातीवर संकट आहे. हा मासा नामशेष होऊ नये. त्यासाठी पर्यावरणावर मनापासून प्रेम हवे. त्यासाठी तत्काळ कृतीची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र अशा प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोकांमध्ये प्रचंड आशावाद असला पाहिजे. त्यानंतरच संरक्षणासाठी काही उपाय शोधता येऊ शकतात, असे ६३ वर्षीय ब्रॉस्ननने लेखात आवर्जून सांगितले आहे.

जपानमधील संशोधनावर टीका
जपानमधील संशोधनाच्या मोहिमेत हजारो मासे मारण्यात आल्याने जगभरातील पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. विज्ञानाच्या नावाखाली व्हेलची हत्या झाल्याची टीकाही झाली. जपानला अशा आकृतीपासून परावृत्त करण्यासाठी ब्रॉस्नन व्हेलच्या संरक्षणासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किलीदेखील मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...