आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यास घाबरणारे पेंग्विन घेत आहे पोहण्याचा वर्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेंग्विनला जन्मत:च पोहणे माहिती असते, परंतु ब्रिटनमधील बर्डलँड पार्क अँड गार्डन्समध्ये शेरलट नावाची पेंग्विन पाण्यात जायला घाबरते. म्हणून ती लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. दहा महिन्यांच्या या किंग पेंग्विनला आता पोहण्याचे धडे दिले जात आहेत. शेरलटचे ट्रेनर आहेत प्राणिसंग्रहालयाचे अॅलिस्टर किन. शेरलटला पोहणे शिकवण्याचा ते खूप प्रयत्न करतात. पण ती पाण्यात जाताच तेथून बाहेर पडते. शेरलटला पाण्यात आणण्यासाठी अॅलिस्टर शेरलटला सांगतात, तू पेंग्विन आहेस. तुला पोहणे जमलेच पाहिजे. सर्व पेंग्विन असे करतात. पण ती आडून बसते. ते पाहणेच खूप गमतीशीर असते. अॅलिस्टर यांनी सांगितले, शेरलटला पंख भिजलेले आवडत नाही. इंग्लंडमध्ये पेंग्विनची ब्रीडिंग होणारे बर्डलँड हे एकमेव ठिकाण आहे. गेल्या ९ वर्षांत जन्मलेली शेरलट ही मादी पेंग्विन आहे.
बातम्या आणखी आहेत...