आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: वॉटरपार्कमध्ये डान्स करणाऱ्यांवर फेकलेल्या कलरमुळे आग, 500 भाजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैपाई - तायवानची राजधानी तैपाई येथील एका वॉटर पार्कमध्ये शनिवारी आग भडकली यात साधारण 500 लोक होरपळले. 80 गंभीर जखमी आहेत तर काही लोक 40 टक्क्यांपेक्षा जास्त भाजले आहेत. स्थानिक अग्निशमक विभागाचे प्रवक्ते म्हणाले, कलर पावडर जमावावर फेकण्यात आले त्यानंतर आग लागली.
तैपाईच्या बाली जिल्ह्यातील फॉरमोसा वॉटर पार्कमध्ये ही दुर्घटना घडली आहे. येथे कलर प्ले पार्टी सुरु होती. स्थानिक वेळेनूसार ही दुर्घटना रात्री साडेआठ वाजता घडली. वॉटर पार्कमध्ये आग भडकली तेव्हा तिथे जवळपास एक हजार लोक होते. शनिवारी वातावरणात रोजच्या पेक्षा जास्त उष्मा होता त्यामुळे पार्कमध्ये गर्दी जास्त होती.
नेमके काय घडले ?
तज्ज्ञांचे मत आहे, की स्टेजवरील बल्ब जास्त तापले होते आणि त्यात स्प्रेचे केमिकल रिअॅक्शन झाल्यामुळे आग लागली. जखमींना तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अनेकांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होत होता.
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले..
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की ही दुर्घटना स्टेजच्या डाव्या बाजूला घडली. सुरुवातीला मला वाटले की हा पार्टीच्या स्पेशल इफेक्टचा भाग असेल, मात्र नंतर लोकांमध्ये चलबीचल सुरु झाली आणि लोक पळापळ करु लागले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दुर्घटनेची छायाचित्रे आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...