आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मधील सर्वात मोठे धरण फुटण्याची भीती; बहुतांश शिख बांधव राहातात धरण परिसरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- नॉर्दन कॅलिफोर्नियात बांधण्यात आलेले अमेरिकेतील सर्वात मोठे ऑरोव्हिल धरण फुटण्याची भीती वर्तवली जात आहे. युबा शहरात हे धरण आहे. परिणामी युबासह परिसरातील शहरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे, युबा शहरात भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 13 टक्के पंजाबी, शिख नागरीक या परिसरात राहातात.

ऑरोव्हिल धरणाची उंची 770 फूट असून त्यात क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा झाले आहे. पुराच्या पाण्याने ऑरोव्हिल धरण ओसंडून वाहात आहे. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 

आपात्कालीन दरवाजा झाला डॅमेज...
- धरणाचा आपात्कालीन दरवाजा उघडण्यात आल्याचे कॅलिफोर्नियाच्या जलसंधारण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. 
- आपात्कालीन दरवाजा डॅमेज झाला आहे. त्यातून पाणी झिरपत होते. धरण कोणत्याही क्षणी फुटण्याची भीतीही अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.  
- धरण परिसर रिकामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. 
- ऑरोव्हिल धरण प्रचंड मजबूत आहे. नाग‍रिकांनी घाबरु नये, असे जलसंधारण मंत्रालयाने आवाहन केले होते. 
- एजन्सीने दिलेली माहिती अशी की, धरण परिसरात 13 टक्के भारतीय वंशाचे अमेरिकन लोक राहातात. त्यात शिख समुदायाची सर्वाधिक संख्या आहे.

ऑरोव्हिल गावाची लोकसंख्या 16000
- ऑरोव्हिल गावाची लोकसंख्या 16000 इतकी आहे.  
- युबा शहरातील आपात्कालीन विभागाने आतापर्यंत 12000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 
- नागरिकांना पूर्व, दक्षिण किंवा पश्चिम दिशेला जाण्यास सांगितले आहे. उत्तर भागात पाण्याचा जोर जास्त आहे.

1 सेकंदांत 1 लाख क्यूबी फूट पाण्याचा उपसा...
 - ऑरोव्हिल धरणाचा आपात्कालीन दरवाजा तुटला आहे. सध्या धरणातून 1 सेकंदात 1 लाख क्यूबी फूट पाण्याचा उपसा होत आहे.
- दरवाज्या खाली 200 फूट लांब आणि 30 फूट खोल खड्डा झाला आहे. इंजिनिअर्ससमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठे धरण...
- ओरिव्हिल धरणाची उंची 770 फूट आहे. देशातील हे सर्वात मोठे धरण आहे. 
- 1961 मध्ये या धरणाचे बांधकाम सुरु झाले होते.  4 मे 1968 रोजी धरणाचे काम पूणे झाले होते.
- कॅलिफोर्नियातील मानवनिर्मित मोठे धरण आहे. कॅलिफोर्निया राज्याला याच धरणातून पाणी पुरवठा होतो.  
- शेतीसोबतच दक्षिण कॅलिफोर्नियातील उद्योग याच धरणाच्या पाण्यावर निर्भर आहेत.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अमेरिकेतील सर्वात मोठे ऑरोव्हिल धरणाचे फोटोज आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...