आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे टॉयलेट वापरण्यासाठी लागतात रांगा; फीस 1500 रुपये तर नाव 'अमेरिका'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युझियममधील गोल्डन टॉयलेट. - Divya Marathi
म्युझियममधील गोल्डन टॉयलेट.
जगात कधी काय घडेल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना न्यूयॉर्कच्या गगेनहेम म्युझियममध्ये चक्क सोन्याचे टॉयलेट लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे टॉयलेट पाहण्यासाठी 25 डॉलर म्हणजे सुमारे 1500 रुपये एवढे पैसे आकारले जातात. लोकही त्यासाठी रांगा लावत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या टॉयलेटला अमेरिका असे नाव देण्यात आले आहे.

18 कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आलेले हे टॉयलेट म्युझियममध्ये येणाऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे. याच्या फ्लशचे हँडर पाईप सर्व काही सोन्यापासून तयार केलेले आहे. लोक पैसे मोजून ते पाहण्यासाठी जातात आणि फ्लश करून कसा अनुभव आहे तेही पाहतात. काही लोक हे टॉयलेट वापरूनही पाहतात. विचित्र असले तरी हे खरे आहे. लोकांना याबाबत भलतीच उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा या सोन्याच्या टॉयलेटचे PHOTOS आणि VIDEO
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...