आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या मेट्रो स्टेशनवर रोजचेच दृश्य, धक्के देऊन घुसवले जातात प्रवाशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जपान नंबर एक रेल्वे व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे लोकांना ट्रेनमध्ये लोटण्यासाठी खास माणसं ठेवण्यात आली आहेत. ते रेल्वे स्टाफचाच एक भाग आहेत. त्यांना 'सबवे पुशर्स' म्हणूनही ओळखल्या जाते. हे कर्मचारी ट्रेनच्या दारांजवळ उभे राहतात. ते लोकांना आतमध्ये लोटण्याचे काम करतात. ट्रेनचे सगळेच दार बंद होत नाही, तोपर्यंत ती पुढे सरकूच शकत नाही. त्यामुळेच, दारांवर थांबलेल्या किंवा आरामशीर चढणाऱ्या गर्दीला लवकरात लवकर चढण्यात मदत करण्यासह गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या स्टाफला तैनात करण्यात आले आहे. 
 

मेट्रो स्टेशनवर दररोज गर्दी
- जपान छोटासा देश असला तरीही लोकसंख्येच्या बाबतीत तो जगातील 10 व्या नंबरचा राष्ट्र आहे. 
- त्यामुळेच, राजधानी टोकियो येथील शिनजुकु मेट्रो स्टेशन दररोज लोकांना खचा-खच भरलेला असतो. 
- या स्टेशनवरून दररोज 30 लाख लोकांच्या फेऱ्या होतात. प्रवाश्यांची संख्या पाहता हे स्टेशन जगातील सर्वात व्यस्त मेट्रो स्टेशन्सपैकी एक आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...