आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: किनाऱ्यावर अडकले होते देवमासे, असे वाचवले लोकांनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युजोंग - इंडोनेशियाच्या युजोंग कारेंग समुद्रकिनारी नागरिकांनी देवमाशांची मदत करून सगळ्यांनी मने जिंकली आहेत. त्यांच्या या मदतीचे जगभर कौतुक केले जात आहे. युजोंग कारेंग किनाऱ्यावर 10 व्हेल मासे अडकले होते. त्यांना परत समुद्रात जाणे कठिण झाले होते. विशालकाय व्हेल मासे पाहून सुरुवातीला नागरिकही धास्तावले. काहींनी मदतीसाठी रेस्क्यू टीमला फोन देखील केला. मात्र, रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत मासे वाचणार नाहीत हे काहींच्या लक्षात आले. अशात एक-दोघे पुढे गेले आणि व्हेल मासांना समुद्रात लोटण्याचा प्रयत्न केला. यानंतर सगळेच एकवटले आणि सगळ्यांनी मिळून एक-एक करत सर्व 10 मासे पुन्हा पाण्यात ढकलले. 
 
यानंतर स्थानिकांच्या चेहऱ्यावर आलेल्या समाधानाचे भाव पाहण्यासारखे होते. काही नागरिकांनी हा संपूर्ण घटनाक्रम आपल्या कॅमेऱ्यात टिपला. त्यापैकी काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, माशांचा हा समूह अचानक किनाऱ्यावर अडकला, असे सूत्रांनी सांगितले. याचे कारण मात्र स्पष्ट केले नाही.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...