आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त करमत नाही म्हणून दरवर्षी शॉपिंगवर सरासरी 1 लाख रुपये, वर 155 तास खर्ची घालतात लोक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेतील एक शॉपिंग वेबसाइट स्वॅप डॉट काॅमने युरोप व आशियाई देशांतील २००० लोकांच्या खरेदीबाबच्या सवयींवर संशोधन केले असून याचा निष्कर्ष अाश्चर्यकारक आहे. जगभरातील लोक केवळ मन रमत नाही म्हणून शॉपिंगला जातात आणि भरमसाट पैसा खर्च करतात. खर्चाची ही वार्षिक सरासरी प्रत्येकी १.०६ लाख रुपये आहे. याला इमोशनल शॉपिंग असे संबोधण्यात आले आहे. 


या अभ्यासात असे आढळून आले आहे की, केवळ करमत नाही किंवा मन रमत नाही म्हणून हे लोक वर्षाकाठी ६५ तास ऑनलाइन शॉपिंग आणि ९० तास स्टोअर्समध्ये जाऊन शॉपिंग करतात. अशा इमोशनल शॉपिंगमध्ये एक ग्राहक वर्षात १८ वस्तूंची खरेदी करून टाकतो. वर्षभरात जगभर जेवढी शॉपिंग केली जाते त्यातील २२% शॉपिंग ही अशीच भावनिक पातळीवर केलेली असते. दरम्यान, करमत नाही म्हणून किंवा तणाव कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या शॉपिंगला संशोधनात ‘रिटेल थेरपी’ असे नाव देण्यात आले आहे.


या वर्षी रिचर्ड थालेर यांना इमोशनल शॉपिंगच्या सवयीवर केलेल्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. थालेर यांच्या संशोधनातही हेच निष्कर्ष होते. थालेर यांच्या या संशोधनावर आधारित नव्या अभ्यासात सहभागी ७० टक्के लोकांनी केवळ मूड नाही म्हणून शॉपिंगचा आधार घेतल्याचे मान्य केले आहे. 


विशेष म्हणजे यानंतर त्यांची मन:स्थिती सुधारल्याचेही त्यांनी सांगितले. १३ टक्के लोकांनी कामावरून आल्यावर थकवा घालवण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर वेळ घालवल्याचे सांगितले, तर ५२ टक्के लोकांनी किमान एकदा तरी मूड चांगला व्हावा म्हणून शॉपिंगचा आधार घेतला. ज्या वस्तूंची गरजच नव्हती, अशा वस्तू काही लोकांनी खरेदी केल्या आहेत. विशेष म्हणजे यातील ४० टक्के लोकांनी अशा खरेदीनंतर पैसे खर्च झाल्याचा अनेकदा पश्चात्ताप होत असल्याचे सांगितले.


नैराश्य, कामाचा ताण कमी करण्यासाठी रिटेल थेरपी
- ४४% लोक नैराश्य घालवण्यासाठी रिटेल थेरपीचा आधार घेतात.
- ४३% लोक करमत नसल्यामुळे काय करायचे म्हणून खरेदी करतात.
- २७ % लोक कामाचा ताणव कमी करण्यासाठी जोरदार शॉपिंग करतात.
- २३% लोक जोडीदाराशी भांडण झाल्यावर रिटेल थेरपीचा आधार घेतात.

बातम्या आणखी आहेत...