आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांपूर्वी विकलांगांची लागत होती बोली, नंतर असे करण्यात येत होते प्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॅडियानला हात-पाय नव्हते. सर्कसमध्ये लोक त्यांना स्नेक मॅन आणि ह्यूमन कॅटरपिलर(किडा) म्हणत होते. विकलांग असूनही प्रिंस रांगत-रांगत अनेक कामे करत असत. - Divya Marathi
रॅडियानला हात-पाय नव्हते. सर्कसमध्ये लोक त्यांना स्नेक मॅन आणि ह्यूमन कॅटरपिलर(किडा) म्हणत होते. विकलांग असूनही प्रिंस रांगत-रांगत अनेक कामे करत असत.
इटरनॅशनल डेस्क- शारिरिक विकलांग असणाऱ्यांना आता समाजात सन्मानाने जगत येत आहे. परंतु, 100 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती, विकलांगांना अनेक प्रकारच्या भेदभावांचा समाना करावा लागत होता. असे विकलांग लोक हे कुटुंबावर एक ओझं असल्यासारखे वाटायचे. काही आई-वडील तर स्वत: आपल्या मुलांना सर्कसमध्ये पाठवत होते. तेथे या लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागत होता. हे फोटो त्याच्या त्या त्रासाचे साक्षिदार आहेत.

सर्कसमध्येच घलवले जिवन...
- त्या काळात विकलांग लोकांना आपले संपूर्ण आयुष्य हे सर्कसमध्येच घालवावे लागत होते.
- या विकलांग लोकांचे सर्कसमध्ये वेगवेगळ्या पद्धतिने प्रदर्शन करून त्यांच्या मार्फत पैसे कमवले जात असत.
- काहींना आपल्या नैसर्गिक विकलांगतेमुळे लोकांमध्ये एक वेगळी ओळख बनवता येत होती, तर काहींना स्वत:मध्ये कौशल्य विकसीत करावे लागत असत.
- सर्कससोबत हे विकलांग संपूर्ण जगाची भ्रमंती करून आपले टॅलेंट दाखवत होते.

विकलांग असूनही विकसीत केले टॅलेंट...
> 1889 मध्ये गियानामध्ये जन्मलेल्या रॅडियानला हात-पाय नव्हते. त्यामुले त्यांच्या आई-वडीलांनी त्यांना सर्कसमध्ये सोडून दिले. सर्कसमध्ये लोक त्यांना स्नेक मॅन आणि ह्यूमन कॅटरपिलर(किडा) म्हणत होते. विकलांग असूनही प्रिंस रांगत-रांगत अनेक कामे करत असत.
> त्या काळात हात नसल्याने सर्कसमध्ये सोडलेल्या कार्ल अंथन यांना आपल्या पायाने व्हॉयोलिन वाजवण्याचे टॅलेंट आत्मसात केले. आपल्या या कौशल्यामुळे ते सर्कसमध्ये आर्मलेस फिडलर नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या 80व्या वर्षी मृत्यूपुर्वी त्यांना आपल्या कथाही प्रकाशीत केल्या होत्या.
> स्टेजवर टॉम थंबच्या नावाने परफॉर्म करणारे चार्ल्स स्ट्रॅटन त्याकाळचे सर्वात प्रसिद्ध सर्कस कलाकार होते. केवळ 25 इंच उंची असलेले चार्ल्स आपला अभिनय आणि डान्सच्या बळावर त्याकाळाचे सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी बनले होते. चार्ल्सची लोकप्रियता एवढी होती की, राष्ट्रपती लिंकन यांनीदेखील त्यांना डिनरसाठी निमंत्रीत केले होते.
बातम्या आणखी आहेत...