आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nepal : सावरल्यानंतर आता बचावलेल्यांची जीवन जगण्यासाठी लढाई, पाहा PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने सर्वकाही उध्वस्त करून टाकले. जिकडे तिकडे ढिगारे आणि त्याखाली दबलेल्यांचा सुरू असलेला शोध असेच चित्र गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये पाहायला मिळत आहे. पण आता परिस्थिती किंचित बदलली आहे. ढिगारे उपसणे सुरुच आहे. अजूनही आपण एखाद्याला वाचवू शकतो या आशेने जवान प्राण पणाला लावून शोध घेत आहेत. पण त्याचबरोबर आता या मोठ्या संकटातून जे बचावले आहेत, त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला आहे. अन्न, पाणी आणि निवारा या मूलभूत गरजांसाठीही वणवण करावी लागत आहे. मदत छावण्यांमध्येच राहण्याव्यतिरिक्त दुसरा काहीही पर्याय अनेकांकडे उरलेला नाही. अगदी आपली घरे कुठे होती, याचाही अंदाज लावणे कठीण जात आहेत. बचाव पथके शक्य तेवढी मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच स्थितीचा अंदाज काही फोटोंच्या माध्यमातून आपण घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहुयात असेच काही मन हेलावणारे PHOTO