आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GROUND REPORT : अॅम्ब्युलन्सचे सायरन थंडावले, शववाहिन्यांची वर्दळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भूकंपामध्ये उध्वस्त झालेला काठमांडूचा मिनार आणि मंदिर याचे ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र. - Divya Marathi
फोटो - भूकंपामध्ये उध्वस्त झालेला काठमांडूचा मिनार आणि मंदिर याचे ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र.
काठमांडूहून राजेशकुमार ओझा आणि मनोज प्रताप
भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळमध्ये ज्यांचे प्राण वाचले आहेत, त्यांना आता इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी अद्याप हवी तशी मदत मिळत नसल्याने अनेकांचे प्राण संकटात आले आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच पाण्याची कमतरता आणि आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांच्या दरामध्ये झालेली अफाट वाढ यामुळे समस्या अधिकच वाढल्या आहेत. भूकंपामुळे होत्याचे नव्हते झालेल्या घचौकमध्ये सविना गोरखा आणि त्यांच्या पत्नीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. अद्याप घचौकमध्ये बचावपथके पोहोचलेली नाहीत.
20 रुपयांचे पाणी शंभर रुपयांना, काठमांडू ते वीरगंजचे तिकिट 5000
भूकंपग्रस्त भागांमध्ये पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे. काठमांडुमध्ये काही दुकाने उघडली पण दुकानदारांनी 20 रुपयांची पाण्याची बाटली शंभर-शंभर रुपयांना विकली. बाजारात सामान उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यात आधीचा स्टॉक पूर्णपणे संपत चालला आहे. बचाव पथकेही पुरेसे अन्न-पाणी पुरवण्यात अपयशी ठरत आहेत.

अद्याप मदतच पोहोचली नाही
लापराक, गुमदा, काशी गाव, सिद्दीवाश, गुमदा, लापू, माजूम, केरवाजा यासह अनेक गावांमध्ये तर अद्याप मदतच पोहोचलेली नाही. याठिकाणाशी संपर्कही झालेला नाही. या भागांमध्ये अडकलेल्या लोकांना विमान पाठवून बाहेर काढण्याचा प्रयत्न समोवारीही अपयशी ठरला. आप्तेष्टांना गमावल्याच्या दुःखाबरोबरच तीन दिवसांनंतरही मदत पोहोचली नसल्याने लोकांचा रागही अनावर होत आहे.

पाण्याची कमतरता
भूकंपाचे धक्के सतत जाणवत असल्यामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांकडे जाण्याची लोक हिम्मत करताना दिसत नाहीत. सोमवारचा दिवस त्या तुलनेत अधिक शांततेच गेला आहे. अॅम्ब्युलेन्सच्या सायरनचे आवाज कमी झाले आहेत. त्याऐवजी आता शववाहिनीचे सायरन वाजत आहेत. संपूर्ण शहरात कोठेही पाणी नाही. काही हॉटेल्स सोडली तर कुठेही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.

घरी परतायला तयार नाही
लोक अजूनही घरी परतायला तयार नाहीत. तंबूमध्ये लोकांनी सध्यातरी जीवन सुरू केले आहे. अशाच प्रकारे तंबूत राहणाऱ्यांपैकी एक असलेले लाल बहादुर सांगतात की, आता तर घरात जायलाही भीती वाटते. घरी कधी परतू ते आम्हालाच मािहती नाही. ते शनिवारपासून मैदानात राहत आहेत. काठमांडूला लागून असलेल्या भक्तपूर इंडस्ट्रीयल एरियाच्या कारखान्यांना कुलूप लागले आहे. प्रवासी मजूर त्यांच्या घरी परतले आहेत. जे अडकले आहेत ते निघण्याच्या प्रयत्नात आहेत. येथील ब्रेड फॅक्टरीत काम करणाऱ्या एकाने सांगितले की, फॅक्टरी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.

वाहतूक व्यवस्थाही पूर्ण विस्कळीत
वाहतुकीच्या साधनांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. बस सेवा जवळपास पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर विमान सेवाही विस्कळीत आहे. काठमांडूच्या गोशाला येथील बस स्थानकाचे बुकींग काऊंटर गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. अनेक वाहने दहापटीने अधिक भाड्याची मागणी करत आहेत. त्रिभुवन एअरपोर्टवर दिल्लीला परतणारे प्रवासी बी.के.सिंह यांनी सोमवारी सांगितले की, सकाळी साडे नऊची फ्लाइट पकडण्यासाठी साडे सहा वाजेपासून ते बसले होते. पण रात्री दहावर्यंत बोर्डींग पास मिळाला नाही. फ्लाईट केव्हा येणार, केव्हा जाणार हे सांगायलाही कोणी तयार नाही.

छतच कोसळले..
दुपारचे सुमारे 12 वाजले होते. संपूर्ण घरात उत्साहाचे वातावरण होते. नेपाळी नववर्षाच्या निमित्ताने संपूर्ण नातेवाईक जमले होते. भक्तपूरचे कमल विनायक, शिव राम गणेश यांनी सांगितले की, आमच्या येथे नवीन वर्षाची परंपरा आहे. सगळे नवीन वर्ष एकत्रित येऊन साजरा करतात. त्यात लोकांनी नुकतीच कार्यक्रमाला सुरुवात केली होती की, एक जोरदार झटका बसला आणि सर्व काही उलटले, काही समजाच्या आत छत कोसळले होते. दोन महिला आणि एक पाच वर्षांचा मुलगा दबला होता. महिलांचे मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखालीच दबलेले आहेत.