आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Peoples Taking Selfie With Smile In Front Of Debris Of Dharahara Tower

संवेदनांचा अंत : ढिगाऱ्याखाली अडकले जीव, पण त्यासमोरही हसून घेताहेत Selfie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - सोशल नेटवर्किंग साईटसेने आपल्याला एवढे असंवेदनशील बनवले आहे का? खरं तर हा प्रश्न यासाठी विचारला जात आहे की, भूकंपामध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेल्या ऐतिहासिक धराहरा टॉवरच्या ढिगाऱ्याखाली अजूनही सुमारे 150 ते 200 जण गाडले गेले असल्याची शक्यता आहे. पण असे असतानाही लोक त्यासमोर हसत हसत सेल्फी काढताना दिसत आहेत. हा क्षणही लोकांना कॅमेऱ्यात कैद करायचा आहे. लोकांच्या मते एकेकाळी येथे नऊ मजली टॉवर होते असे त्यांना सांगता येईल. हे सेल्फी टि्वटर फेसबूकवरही पोस्ट केले जात आहेत.

एमबीएचा विद्यार्थी असलेला 21 वर्षीय पवन त्याच्या गावातून काठमांडूला आला होता. हे दृश्य पाहून तो चांगलाच निराश झाला. तो म्हणाला की, काही लोकांना हा भूकंपही टुरीझमप्रमाणे दिसत आहे. हा प्रकार योग्य नाही. लोक येथे ढिगाऱ्यावर चढून फोटो काढत आहेत. पण त्याखाली कोणीतरी गाडले गेले असेल याची त्यांना चिंताह नाही. येथील दुःख समजून घेण्याऐवजी ते फोटो काढण्यात अधिक मशगूल आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, अशाच काही सेल्फी बहाद्दरांचे Photo's