आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK ला दहशतवादी देश घोषीत करण्यासाठी US मध्ये मोहीम, ऑनलाईन पिटीशनला रेकॉर्डतोड प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टनः उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला दहशतवादी देश जाहिर करण्यासाठी अमेरिकेत राहाणारे भारतीय-अमेरिकनांनी मोहिम सुरू केली आहे. या लोकांनी एक ऑनलाईन व्हाईट हाऊस पिटीशन सुरू केले आहे. या रेकॉर्डला पाचपट पाठिंबा मिळाला आहे. हा आकडा ओबामा अॅडमिनिस्ट्रेशनचे लक्ष खेचण्यासाठी हवे असलेल्या १ लाख लोकांच्या आकड्यांपेक्षा जास्त आहे. नुकतेच रिपब्लिकनचे खासदार टेड पो यांनीसुध्दा अमेरिकन संसदेत पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करण्यासाठी बील सादर केले आहे. केव्हा सुरू केले होते कॅम्पेन...
- हे ऑनलाईन पिटीशन 21 सप्टेंबर रोजी सुरू केले होते. अमेरिका आणि भारतासोबतच अनेक देश पाकिस्तान स्पॉन्सर दहशतवादाने प्रभावित झाले आहेत, असे या पिटीशनमध्ये सांगण्यात आले आहे. यामुळेच पाकिस्तानला एक दहशतवादी देश म्हणून जाहीर करावे.
- या पिटीशननंतर व्हाइट हाऊसच्या वेबसाईटने कायदेशीर भारतीय-अमेरिकनांसाठी एक विंडो उपलब्ध करून दिली आहे.
काय असते ऑनलाईन व्हाइट हाउस पिटीशन?
- कोणताही व्यक्ती कोणत्याही मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक ऑनलाईन पिटीशन सुरू करू शकतो.
- नियमानुसार, सरकार यावर तेव्हाच विचार करते, जेव्हा पिटीशनला ३० दिवसात १ लाख लोकांचा पाठींबा मिळतो.
- पिटीशननुसार, ओबामा अॅडमिनिस्ट्रेशन ६० दिवसाच्या आत प्रतिउत्तर देण्याची शक्यता असते. आता ही विंडो २१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
या पिटीशनमध्ये आतापर्यंत काय झाले?
- या पिटीशनला यूएसमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन आठवड्याच्या आतच आतापर्यंत पाच लाख लोकांनी याला सपोर्ट केला आहे.
कोणी लावली होती पिटीशन
- स्वतःचे नाव आरजी (RG) सांगणाऱ्या एका व्यक्तीने ही ऑनलाईन पिटीशन दाखल केली होती.
लोकांनी सांगितले की, आम्ही आता थांबणार नाही.
- यासंबंधीत जॉर्जटाउन यूनिवर्सिटीचे शास्त्रज्ञ अंजू प्रीत यांनी लिहिले आहे की, "जोपर्यंत आम्हाला १० लाख सिग्नेचर मिळत नाही, तो पर्यंत आम्ही थांबणार नाही. आता कार्यवाहीची वेळ आली आहे. चला आपण सगळे पिटीशनवर सिग्नेचर करण्यासाठी हात मिळवू या. कमीत कमी तुमच्या १० मित्रांना आणि कुटुंबातील लोकांना टॅग करा"
हाउस ऑफ रिप्रेजेंटेटीव्हमध्ये यापूर्वीच आणले आहे बील
- हाउस ऑफ रिप्रेजेंटेटीव्हमध्ये रिपब्लिकन खासदार टेड पो यांनी अजून एक खासदार डाना रोहराबेकर यांच्यासोबत 'पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम डेझिग्नेशन एक्ट (HR 6069)' सादर केला होता. पो हाउस ऑफ रिप्रेजेंटेटीव्हमध्ये दहशतवादावर बनलेल्या सर्व कमेटीचे चेअरमन सुध्दा आहेत.
- पो यांच्या मतानुसार, "आता वेळ आली आहे की आपण पाकिस्तानला त्यांची दुश्मनी काढण्यासाठी पैसे द्यायचे बंद करायला हवे. त्याला तो जे आहे ते जाहिर करायला हवे."
- "पाकिस्तान एक असा सहयोगी आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. तो अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या शत्रूंची मदत करत आला आहे", असेही पो म्हणाले.
- पो यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, "मी भारताच्या कश्मीरमध्ये आर्मी बेसवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निशेध करतो. या हल्ल्यात भारतातील 18 जवान शहीद झाले आहेत. भारत हा आमचा एक जवळचा सहयोगी आहे. "

बातम्या आणखी आहेत...