आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या 85% लोकांचा सरकरावर विश्वास, 55% नागिरकांना हवी एकाधिकारशाही-मिलिटरी रुल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये सात दशकांपासून लोकशाही आहे. - Divya Marathi
भारतामध्ये सात दशकांपासून लोकशाही आहे.
वॉशिंग्टन - भारतातील 85% लोकांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला असून 55% लोकांनी मिलिटरी रुल आणि एकाधिकारशाहीला पाठिंबा दर्शवला आहे. जगातील महत्त्वाच्या देशांमधील गव्हर्नन्ससंबंधी अमेरिकेची थिंक टँक प्यू रिसर्च सेंटर (Pew Research Center) ने हा सर्व्हे केला होता. 
 
 भारतात सात दशाकांपासून लोकशाही 
 - Pew Research Centerच्या अहवालानुसार, भारतात गेल्या 70 वर्षांपासून लोकशाही मजबूत स्थितीत आहे. मात्र 55% नागरिकांनी मिलिटरी शासन आणि एकाधिकारशाहीला पाठिंबा दिला आहे. 
 - या सर्व्हेनुसार 2012 पासून भारताची आर्थिक सरासरी 6.9% दराने वाढत आहे. 
 - देशातील 27% लोकांनी भारताला एक मजबूत नेता हवा असल्याचे मत नोंदवले  आहे. तर, रशियाच्या 48% नागरिकांनी त्यांच्या सरकारचे नेतृत्व मजबूत हातात पाहिजे अशी आपेक्षे व्यक्त केली आहे. 
 - जगभरातील 26% लोकांचे म्हणणे आहे की एक मजबूत नेता चांगले सरकार चालवू शकतो. तो संसद आणि कोर्टाच्या ढवळाढवळीशिवाय निर्णय घेऊ शकतो. 
 
- प्यू रिपोर्टमध्ये म्हटले आहे, आशिया पॅसिफिकच्या तीन देशांनी टेक्नोक्रॅसीला पाठिंबा दिला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. 
- आशिया-पॅसिफिक देशातील लोक हे तज्ज्ञांच्या (टक्नोक्रॅसी) शासनाला अधिक महत्त्व देतात. यामध्ये व्हिएतनाम, भारत आणि फिलिपिन्स यांचा समावेश आहे, 
- ऑस्ट्रेलियाच्या 57% लोकांचे मत आहे की जर एक्सपर्ट्स शासन करत असतील तर त्यांच्यासाठी हा योग्य मार्ग नाही. तिथल्या 41% लोकांनीच तज्ज्ञांना सरकार चालवण्यासाठी योग्य म्हटले आहे. 
बातम्या आणखी आहेत...