आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचडी विद्यार्थ्यास अमेरिकी व्हिसात सूट, भारतीयांना लाभ; अमेरिकन संसदेत विधेयक सादर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या विदेशी नागरिकांना आता एच-१ बी व्हिसाच्या नियमांमधून सवलत मिळू शकते. या संदर्भातील एक विधेयक अमेरिकेच्या कनिष्ठ सभागृहात नव्याने सादर करण्यात आले आहे.
 
विधेयकानुसार, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी किंवा गणितातून पीएचडी करत असलेल्या विदेशी नागरिकांना रोजगाराच्या संख्येनुसार ग्रीन कार्ड व एच-१ बी व्हिसासंबंधी अटी लागू व्हायला नको. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह) खासदार अॅरिक पॉलसन व माइक किगली यांनी ‘द स्टॉपिंग ट्रेंड इन अमेरिका पीएचडी फ्रॉम लिव्हिंग इकॉनॉमी अॅक्ट’ नामक हे विधेयक मांडले. या विधेयकाचा भारतीयांना खूप फायदा होऊ शकतो. कारण अमेरिकेत पीएचडी करणाऱ्यांत भारतीय विद्यार्थ्यांचे बहुतांश प्रमाण आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासंबंधी नियम कठोर करण्यासाठी पावले उचलली आहेत.

सृजनशीलतेला चालना देण्यासाठी गुणवत्तेस वाव द्यावा  : खासदार किगली यांच्या मते, अमेरिकेतील सृजनशीलतेला चालना देण्यासाठी, अार्थिक विकास साध्य करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठेत मजबूत प्रतिस्पर्ध्याच्या रूपात कायम राहण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जगभरातील गुणवत्तापूर्ण लोकांना अमेरिकेत शिक्षण, काम करण्याची तसेच आपल्या समाजात सहभागी होण्याची संधी द्यायला हवी. विदेशातील लोकांना आपण अमेरिकेत शिक्षण घेऊ दिले नाही तर आपण आपल्या तंत्रज्ञानविषयक संशोधनाला चालना देऊ शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...