मनिला - बंदराचे शहर ऑरमाकमध्ये पोहोचलेल्या एका बहुमजली जहाजाला अचानक आग लागली. काही क्षणांत संपूर्ण जहाजाला आगीने कवेत घेतले. यामुळे एकच हलकल्लोळ झाला. चालक दल सदस्यांनी प्रसंगावधान पाहून सर्व ५४४ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. काही प्रवाशांनी जहाजावरून उड्या टाकल्या. बचावकार्यादरम्यान काही सदस्यांना किरकोळ दुखापत झाली. हे जहाज केबू शहराजवळील लीते आयलँडहून आले होते. आगीचे कारण समजू शकले नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो..