आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Philippines Passenger Boat Accident Capsizes. Latest News In Marathi

फिलिपिन्सच्या समुद्रात बुडाली बोट, 33 प्रवाशांना जलसमाधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला- फिलिपिन्सच्या समुद्रात एक फेरी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत 33 प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे. 'द किम निर्वाना' असे या बोटचे नाव असून त्यावर 173 प्रवासी होते अनेक अद्याप बेपत्ता आहेत. मदत आणि बचाब पथक घटनास्थळी दाखल झाले असून कोस्ट गार्डच्या मदतीने बचावलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम सुरु आहे. मिळालेली माहिती अशी की, द किम निर्वाना ही फेरी बोट ऑरमोक सिटीमधील बंदरातून कॅमोटेसच्या दिशेने निघाली होती. बोट ऑरमोक बंदरावरापासून एक किलोमीटर अंतरावरच बोट बुडाली. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. तसेच बचावलेल्या प्रवाशांना ऑरमोकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.