आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलीपीन्स:राष्‍ट्रपतींच्या आदेशावरुन 1000 जणांचा मर्डर, चिकनप्रमाणे कापले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीच्या हत्येमुळे रस्त्यावर रडत असलेल्या या महिलेचा छायाचित्र दुतेर्तेची निर्दयतेचा मुखवटा आहे. (फाईल) - Divya Marathi
पतीच्या हत्येमुळे रस्त्यावर रडत असलेल्या या महिलेचा छायाचित्र दुतेर्तेची निर्दयतेचा मुखवटा आहे. (फाईल)
मनिला - अंमलीपदार्थांच्या तस्करीबाबत क्रूर कारवाई केल्याने चहूबाजूने टीका होत असलेले फिलीपीन्सचे राष्‍ट्रपती रोड्रिगो दुतेर्तेविषयी अनेक अवाक् करणारे खुलासे समोर आले आहेत. दुतेर्तेच्या डेथ स्क्वॉडमध्‍ये सामिल असलेल्या एडगर माटोबाटोने चौकशी समितीला सांगितले, की दुतेर्तेने महापौर होण्‍यासाठी आपल्या चार राजकीय विरोधकांची हत्या केली होती. यात त्यांचा स्पर्धक प्रोस्पेरो नोग्राल्सही होता. माटोबाटोच्या दाव्यानुसार 1988 ते 2013 या काळात आम्ही जवळपास एक हजार लोकांची हत्या केली. तो इतका क्रूर आहे, की एक व्यक्त‍िला मगरी समोर फेकून दिले होते. काय खुलासा केला माटोबाटोने...

- 57 वर्षांचे माटोबाटोने दावा केला, की राष्‍ट्रपतीने आमच्या समोर न्याय विभागातील कर्मचा-यावर गोळ्या झाडल्या होत्या. यानंतर आम्हाला विरोधकांना मारण्‍याचा आदेश दिला गेला.
- जेव्हा शहराच्या मोठ्या चर्चमध्‍ये स्फोट झाला तेव्हा महापौर दुतेर्तेने एका मशिदीत शिरुन मुस्लिमांना मारण्‍याचे आदेश दिले होते, असाही खुलासा माटोबाटोन केला.
- दुतेर्तेने रेडिओ निवेदक जून पालाच्या हत्येचाही आदेश दिला होता. कारण तो दुतेर्तेच्या हुकुमशाहीविरोधात मोहिम चालवत होता.
- दुतेर्तेने ब-याच विरोधकांना हिंसक प्राण्‍यांंचे भक्ष्य बनवले होते. इतर विरोधकांना सागरी माशांचे खाद्य बनवले. अनेकांना जिवंत जाळून संपवले.
माटोबाटोवर हत्येचे 50 खटले
- माटोबाटोने 2009 मध्‍ये आत्मसमर्पण केले होते. त्याच्यावर 50 पोलीस कर्मचारी व अंमलीपदार्थांच्या तस्करांच्या हत्येचा आरोप आहे.
- ते म्हणाले, आमचे काम रोज गुन्हेगार, बलात्कारी, चोर आणि लुटारुंना मारणे होते.
'ऊजी गनने मॅगझीन रिकामे केले'
- माटोबाटो म्हणाले, 1993 मध्‍ये आम्ही डेथ स्क्वॉडचे सदस्य मोहिमेवर होतो. तेव्हा नॅशनल इन्व्हेस्टीगेशन ब्युरोच्या कायदा विभागाचा एक एजंट तेथे रोखण्‍यासाठी आला.
- त्याच्याशी भांडण सुरु असताना गोळीबार झाला. यावेळी दवाओचे तत्कालीन महापौर रोड्रिगो दुतेर्ते येथे आले. येताच त्यांनी दोन ऊजी मॅगझीन त्या एजंटवर शरीरात उतरवले. यात त्याचा मृत्यू झाला.
- फिलीपीन्सच्या मानवी हक्क आयोगाचे माजी अध्‍यक्ष सिनेटर लीला दे लीमा यांनी चौकशी आयोगाला सांगितले, की माटोबाटोने तपासकर्त्यांसमोर 2009 मध्‍ये आत्मसमर्पण केले होते. त्यांच्या माहितीपूर्वी दुतेर्तेविरोधात अनेक भयावह प्रकरणे समोर आली आहेत. राष्‍ट्रपती झाल्यावर 72 दिवसांच्या आत तीन हजार 500 हत्या, 6.5 लाख जणांनी आत्मसमर्पण केले आहे.
- राष्‍ट्रपती निवडणुकीच्या प्रचारात दुतेर्तेने म्हणाले होते, अंमलीपदार्थांशी तुम्ही संबंधित सर्व लोक, सन ऑफ बीच, मी तुम्हा सर्वांना मारुन टाकेल.
- 30 जूनला सत्तेची सूत्रे हातात घेताच दुतेर्तेने फिलीपीन्स नॅशनल पोलीसला (पीएनपी) अंमलीपदार्थांचे व्यापारी व कथित अंमलीपदार्थांचे सेवन करणा-यांविरोधात कारवाई करण्‍याचेे आदेश दिले होते.
- हजारो अंमलीपदार्थांच्या तस्करांची तुरुंगात रवानगी झाली आहे. 6.5 लाखांपेक्षा जास्त अंमलीपदार्थांच्या व्यापा-यांनी आत्मसमर्पण केले आहे.
- आतापर्यंत पोलीस अंमलीपदार्थांच्या नावाखाली तीन हजार 500 लोकांची हत्या केली आहे. यात एक हजार 500 लोक पोलिसी कारवाईत मारले गेले आहेत. यांना ना न्यायालयात नेण्‍यात आले, ना कोणती सुनावणी झाली. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या.
- दुतेर्तेने अंमलीपदार्थांच्या व्यापा-यांची हत्या करण्‍यासाठी सामान्य नागरिकांनाही पैसे व पदके देण्‍याची घोषण केली आहे.
- टाइम मासिकाने दुतेर्तेला 'द पनिशर'चे या नावाने संबोधले आहे. जो फक्त शिक्षा देण्‍यावर विश्‍वास ठेवतो.