आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

McDonald\'s ने ग्राहकाला दिले बुरशी लागलेले बर्गर, फेसबुकवर छायाचित्रे झाली व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडवर्ड पोर्टरचे फेसबुक पोस्ट. लाल वर्तुळात बर्गरवर लागलेली बुरशी. - Divya Marathi
एडवर्ड पोर्टरचे फेसबुक पोस्ट. लाल वर्तुळात बर्गरवर लागलेली बुरशी.
लंडन - अमेरिकेची प्रसिध्‍द फास्ट फुड साखळी असलेल्या मॅक्डोनाल्ड्सने एका ग्राहकाला बुरशी लागलेले बर्गर दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. लंडनच्या होलबॉर्न भागात राहणा-या एडवर्ड पॉर्टरने मॅक्डोनाल्डच्या बर्गरची छायाचित्रे फेसबुकवर पोस्ट केली आहेत. त्यात बर्गरच्या ब्रेडवर बुरशी दिसत आहे. ही पोस्ट 67 हजार 150 पेक्षा जास्त वेळा शेअर करण्‍यात आली आहे.

नाराज ग्राहकाने काय लिहिले?
33 वर्षांच्या एडवर्डने आपल्या फेसबुक अकाउंटवर मॅक्डोनाल्ड्स हॅशटॅगसह लिहिले, होलबॉर्नमध्‍ये मी मॅक्डोनाल्डचे बर्गर ऑर्डर केले होते. पावाला लागलेली बुरशी पाहिली. याबाबत मी कंपनीकडे तक्रार केली, तर मला 15 पौंडांचे व्हाऊचर हातात देण्‍यात आले. मात्र ते घेण्‍यास मी नकार दिला. नंतर त्याची दोन छायाच‍ित्रे फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली. युजर्स यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काहींना कंपनीने देऊ केलेल्या 15 पौंडाचा मुद्द उचलला, तर काहींनी कंपनीच्या चुकीवर बोट ठेवले.
मॅक्डोनाल्डचे स्पष्‍टीकरण
एडवर्डने चुकीचा मोबदला मागितला होता, असे मॅक्डोनाल्डच्या एका प्रवक्त्याने सांगितले. 4 जून रोजी आम्हाला सूचना मिळाली. आम्ही एडवर्डची माफी मागितली. त्याचे पैसे परत केले. नंतर प्रकरणाची चौकशी सुरु झाली. मेन्यूतून बर्गरला हटवले गेले आहे, असे प्रवक्त्याने स्पष्‍ट केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित छायाचित्रे...