आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम्: हा आहे बटाटा, किंमत 7 कोटींपेक्षा जास्त, इंटरनेवर फोटो Viral

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बटाट्याचा हाच फोटो 10 लाख डॉलरमध्ये विकला गेला. - Divya Marathi
बटाट्याचा हाच फोटो 10 लाख डॉलरमध्ये विकला गेला.
प्रसिद्ध आयरिश फोटोग्राफर केव्हीन अबॉश यांनी काढलेल्या बटाट्याचा हा फोटो तब्बल दहा लाख डॉलरपेक्षा अधिक किमतीत (भारतीय चलनामध्ये सात कोटींपेक्षा अधिक) विकला गेला आहे. युरोपातील एका उद्योगपतीने गेल्यावर्षी हा फोटो खरेदी केला. अबॉश यांच्या पॅरिसमधील घरी जेवण करताना त्यांनी हा फोटो पाहिला होता.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या एका साध्या बटाट्याचे हे तेवढेच साधारण पोट्रेट आहे. पण त्यासाठी एका उद्योगपतीने तब्बल 10 लाख डॉलर खर्च केल्याचे वृत्त आहे. हा फोटो काढणारे फोटोग्राफर केव्हीन अबॉश हे एका फोटोसाठी तब्बल पाच लाख डॉलर एवढी रक्कम आकारतात. प्रामुख्याने ते बड्या हस्तींचे फोटो काढतात.

सध्या प्रसिद्ध झालेल्या या बटाट्याच्या फोटोच्या अबॉश यांनी 2010 मध्ये ३ प्रिंट्स केल्या होत्या. त्यापैकी एक त्यांनी स्वतःच्या घरामध्ये लावली होती. दुसरी सर्बियातील एका संग्रहालयाला दान केली होती आणि तिसरी विक्री केली होती. मला बटाटे आणि मानवांमध्ये बरेच साधर्म्य वाटते. त्यामुळे बटाट्याचे फोटो क्लिक केले असे अबॉश यांनी सांगितले.

जर बटाट्याच्या या फोटोच्या किमतीची तुलना करण्यात आली तर जगातील आजवरच्या सर्वात महागड्या ठरलेल्या फोटोंमध्ये याचा 15 वा क्रमांक लागेल. पण खरेदी करणाऱ्याचे नाव समोर येत नसल्याचे त्यावर शिक्कामोर्तब होणे शक्य नाही. सध्या सर्वात महागड्या फोटोचा विक्रम अँड्रेस गर्सकी यांच्या फोटोच्या नावावर आहे. हा फोटो 43 लाख अमेरिकन डॉलर एवढ्या किमतीत विकला गेला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा अबॉश यांनी क्लिक केलेले काही बड्या हस्तींचे Portraits...
फोटो सौजन्य - केव्हीन अबॉश