आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Photo Series Of LGBT Couples Fictional Love Story By Arjun Kamath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : समलैंगिक जोडप्याची Love Story आणि हादरवून सोडणारा शेवट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजल्स येथील फोटोग्राफर आणि फिल्म स्टुडंट असलेल्या अर्जुन कामत याने समलैंगिक जोडप्याची लव्ह स्टोरी आणि त्यावर समाजातून येणाऱ्या प्रतिक्रिया दाखवणारी एक फोटो सिरीज काही दिवसांपूर्वी अपलोड केली आहे.

दोन समलैंगिक मुलींची कथा या फोटोंमधून मांडण्यात आली आहे. एकमेकींवर आतोनात प्रेम करणाऱ्या या दोघांना जेव्हा समाजातील काही प्रवृत्तींचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या भावना दाखवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. समाजामध्ये यांनाही त्यांच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे हे पटवून देण्यासाठी अत्यंत सुंदर फोटोंच्या माध्यमातून ही स्टोरी साकारण्यात आली आहे. अर्जुन कामत यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये वापरण्यात आलेले पात्र पाहता, याद्वारे भारतातील स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते.

भारतामध्ये अजूनही समलैंगिक नात्यांना मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे अशा जोडप्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. माझेही काही गे मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ही फिक्शन लव्ह स्टोरी तयार केल्याचे कामत सांगतात. या फोटो सिरीजला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मला या माध्यमातून एकाचा जरी काही फायदा करून देता आला तरी पुरे असे कामत याबाबत म्हणाले.  

पुढील स्लाइड्सवर फोटोद्वारे पाहा, ही Love Story...