आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुर्क्यातून असे दिसते जग, ऑस्ट्रेलियन फोटोग्राफरने टिपले असे PHOTOS...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील अवॉर्ड विनिंग फोटोग्राफर फाबियान मुइर नेहमीच जाणून घेण्यास उत्सूक होते, की मुस्लिम महिलांना बुर्कामधून कसे वाटत असेल? आपली ही इच्छा त्यांनी नवीन फोटो सिरीज 'ब्लू बुर्का इन सनबर्न्ट कंट्री' मध्ये पूर्ण केले. यात त्यांनी बुर्का घालणाऱ्या एका महिलेच्या मागे थांबून तिच्या समोरील जग कॅमेऱ्यात टिपले आहे. 
 

बिकिनी गर्ल्सपासून मॉल पर्यंत असे दिसले
- फाबियान यांनी या आगळ्या-वेगळ्या प्रयत्नातून जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला, की एवढ्या प्रगत झालेल्या समाजात बुर्का घालणाऱ्या महिलेला कसे अॅडजस्ट करावे लागत असेल? आपल्या जवळपास छोट्या कपड्यांमध्ये फिरणाऱ्या महिला त्यांना योग्य वाटतात का? त्यांच्या नजरेतून हे जग कसे दिसत असेल? 
- फाबियान यांनी शॉपिंग मॉलमध्ये निळ्या रंगाचा बुर्का घातलेल्या या महिलेला गर्दीपासून वेगळे दाखवले आहे. याच महिलेला बीच गेल्यानंतर तिच्या समोर बिकीनीमध्ये बसलेल्या इतर महिला दाखवण्यात आल्या आहेत. या फोटोशूट दरम्यान कुणीही फाबियान यांना अडवले नाही. केवळ एका मुस्लिम व्यक्तीने यावर आश्चर्य व्यक्त केला. 
- या फोटोशूटमध्ये फाबियान यांनी ऑस्ट्रेलियाच्या एका मोठ्या परिसरात प्रवास केला. ते प्रत्येक अँगलने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. 
 

लोकांचेही केले निरीक्षण
या फोटोशूटच्या माध्यमातून फाबियान यांनी मुस्लिम महिलांविषयी लोकांचा दृष्टीकोन सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सद्यस्थितीला सुद्धा ऑस्ट्रेलियातील अनेक लोक मुस्लिम शरणार्थी महिलांविषयी सहानुभूती किंवा संबंध ठेवत नाहीत. एका महिलेला उभे करून कुणी फोटोज काढत असल्याबद्दल त्यांना काहीच फरक पडत नाही. मुस्लिम महिलांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी आपल्या मर्जीने बुर्का घातल्यास त्यावर कुणालाही आक्षेप घेण्याची गरज नाही.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...