आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच समोर आली क्यूबाची छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवानाच्या रस्त्यावर स्थानिक लोक. - Divya Marathi
हवानाच्या रस्त्यावर स्थानिक लोक.
अमेरिकेने कॅरेबियन देश क्युबावरील 52 वर्षांचे निर्बंध हटवले आहेत. प्रथमच या देशाची काही छायाचित्रे समोर आली आहेत. अमेरिकन छायाचित्रकार रॉबर्ट लँगने या देशातील दैनंदिन जीवन आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. यात बे ऑफ पिग्स आणि सेंट लुसियापासून त्रिनिदादसारख्‍या शहरांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. 1961 मध्‍ये अमेरिकेने क्युबाबरोबर राजकीय संबंध तोडले होते. गेल्या वर्षी निर्बंध मागे घेतले गेले. निर्बंध हटल्यानंतर वाढली पर्यटकांची संख्‍या...
- रॉबर्ट 2008 साली क्युबात जाऊन आला आहे. तेव्हा प्रवासाला बंदी होती. यामुळे त्यांना लंडनहून विमानाने जावे लागले होते.
- त्यांच्या मतानुसार, गेल्या सात वर्षांमध्‍ये हा देश खूप बदलला आहे.
- हवानाला गेल्यानंतर 2008 सालच्या तुलनेत पर्यटकांची संख्‍या वाढली.
- हवाना तुम्हाला वसाहतकालीन वास्तूशास्त्र पाहायला मिळते.
- येथे थांबण्‍यासाठी हॉटेल शोधण्‍याची गरज नाही. तुम्ही स्थानिकांच्या घरात राहू शकाल.
- रॉबर्टच्या मतानुसार, क्युबाच्या बहुतेक रस्त्यांवर जुनी अमेरिकन मॉडल्स कार धावताना दिसतील.
- या कारणामुळे येथील रस्ते कोणत्यातरी कार संग्रहालयाप्रमाणे दिसतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा अमेरिकन छायाचित्रकाराच्या नजरेतून क्यूबा...