आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीच्या कॅम्पमध्ये अशी आहे LIFE, महिला फोटोग्राफरने टिपले क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाद - एका महिला फोटोग्राफरने सौदी अरबच्या धरहान शहरातील चर्चित सौदा अरैमको रेसिडेंशियल कॅम्पचे फोटो टिपले आहेत. पाकिस्तानी वंशाची अमेरिकन फोटोग्राफरने या कॅम्पमधील लोकांचे जीवन सौदीच्या इतर लोकांपेक्षा वेगळे कसे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केले आहे. खरं तर अरैमको सौदी अरबची राष्ट्रीय पेट्रोलियम आणि गॅस कंपनी आहे. ही जगातील सर्वाधिक व्हॅल्यूएबल कंपनीही मानली जाते. कंपनीशी संबंधित लोकांची सुमारे 4,000 कुटुंबे अरैमको रेसिडेंशियल कॅम्पमध्ये राहतात. फोटोग्राफर आयेशा मलिक हिच्या मते, सुरक्षा रक्षकांचा चारही बाजुंनी घेराव असलेल्या या कॅम्पमध्ये अमेरिका आणि सौदी अरबच्या संस्कृतीचा एक अनोखा मिलाफ पाहायला मिळतो.

आयेशा म्हणाली की, प्रथमदर्शनी या कॅम्पला भेट देणाऱ्याला याठिकाणी त्याला माहिती असलेले सौदी अरब दिसत नाही. हा कॅम्प सुमारे 23 चौरस मैल परिसरात पसरलेला आहे. फोटोग्राफरने सांगितले की, याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी अनेक वेगळे नियम केले आहेत. याठिकाणी अनेक महिला ड्राइव्ह करतानाही आढळतात. याठिकाणी अनेक प्रकारचे निर्बंध आहेत, पण लोकांसाठी जीवन सहज आहे. आयेशाच्या मते याठिकाणी सौदी अरबमधील इतर भागांच्या तुलनेत अधिक स्वातंत्र्य आहे. सौदी अरबच्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी फोटोग्राफीवर बंदी असते. पण आयेशाने याठिकाणी सरकारी इमारतींचे फोटोदेखिल घेतले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, याठिकाणचे आणखी काही PHOTOS...