आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रीट मसाज आणि बीअर पार्टी, बँकॉकच्या रस्त्यांवर अशी असते Night Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉकच्या खाओ सान रोड परिसरातील रात्रीचे दृष्य. - Divya Marathi
बँकॉकच्या खाओ सान रोड परिसरातील रात्रीचे दृष्य.
बँकॉक - थायलंडची राजधानी बँकॉकमधील हे रंगीत नजारे फोटोग्राफर मॅसिज दाकोविजने कॅमेऱ्यात टिपले आहेत. कार्डिफची नाईटलाईफ कव्हर करणाऱ्या मॅसिज यांनी नेहमी लगबग असलेल्या बँकॉकच्या रस्त्यांची निवड केली. या फोटोंमध्ये दिसणाऱ्या रस्त्यांवरील रंगत पाहता ब्रिटनच्या एखाद्या मोठ्या शहरातील हे चित्र असल्याचे जाणवते. 2012 ते 2015 या दरम्यान फोटोग्राफरने हे फोटो टिपले आहेत.

नाइटलाइफच्या चाहत्यांसाठी स्वर्ग
हे शहर नाइटलाइफच्या चाहत्यांसाठी स्वर्गासमान आहे. दरवर्षी जगभरातील विद्यार्थी याठिकाणी मौज करण्यासाठी येत असतात. फोटोग्राफर मॅसिज हेदेखिल असेच पोहोचले होते. रॉयल पॅलेसजवळ असलेल्या खाओ सान रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये ते थांबले. हा स्पॉट अनेक वर्षांपासून पॉप्युलर टुरिस्ट्स स्पॉट बनला आहे. हॉटेलच्या बाहेर दिसणाऱ्या या झगमगत्या नाईट लाइफला कॅमेऱ्याने टिपण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही.

मॅसिज यांचे अनुभव
काही दिवसांपूर्वीच बँकॉकहून मुंबईला पोहोचलेले पोलिश फोटोग्राफर मॅसिज यांनी सांगितले की, मी जेव्हा बँकॉकला जातो तेव्हा मी नेहमी खाओ सान रोड परिसरातच राहिलो. कमी सामानासह कमी खर्चात राहू इच्छिणाऱ्यांसाठी हे योग्य ठिकाण आहे. येथे अनेक वर्षांपासून पर्यटक येत आहेत. ते रॉयल पॅलेस आणि इतर पर्यट स्थळांच्या प्रेमात असतात. येथे अनेक बार, रेस्तरॉ, दुकाने आणि ट्रॅव्हल एजंटस उपलब्ध आहेत.

दिवसा सामसूम असतो रस्ता
मैसिज यांनी सांगितले की, जर तुम्ही याठिकाणी नवे असाल तर येथे तुमच्यासाठी करण्यासाठी नेहमी काही ना काही असते. दिवसा याठिकाणी त्यामानाने थोडी शांती असते. पण रात्री रस्त्यावर नाइट मार्केटची रंगत स्पष्ट दिसते. वीकेंड्सला या परिसरात गर्दीत सुमारे दुपटीने वाढ होते. लोकल थाई युवकही यात सहभागी होतात.

पुढील स्लाइड्समध्ये पाहा बँकॉकमधील या Night Life चे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...