आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Shoot Inside Photos Of Postmortem Room

PHOTOS : फोटोग्राफरच्या नजरेतून पाहा पोस्टमॉर्टम रूममधील वातावरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोस्टमॉर्टमसाठी ठेवलेला मृतदेह. - Divya Marathi
पोस्टमॉर्टमसाठी ठेवलेला मृतदेह.
डेन्मार्कची फोटोग्राफर कॅथरीन अर्टमॅनने व्यक्तीच्या मृत्यूपासून अंत्यसंस्कारापर्यंतच्या गूढ प्रवासाचे फोटो टिपले आहेत. 'अबाउट डाइंग' नावाचा कॅथरीनचा हा प्रोजेक्ट मृत्यूशी संबंधित असला तरी तो भयावह असण्यापेक्षा एक शांत पण गूढ उकलणारा ठरला. कॅथरीनने पोस्टमॉर्टमपासून मृतदेहाच्या अंत्यसंस्कारापर्यंत सर्व पातळ्यांवरील फोटो टिपले आहेत. मृत्यूच्या प्रवासाच्या या अभ्यासामुळे जीवनाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाल्याचे कॅथरीन सांगते.

आराहूस यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजिकल इन्स्टीट्यूटमधून कॅथरीनला शवगृह (मोर्चरी), पोस्टमॉर्टम टेबल आणि स्मशानात हा अनुभव घेण्याची परवानगी आणि संधी मिळाली. मृत्यूनंतर व्यक्तीला कोण-कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागते त्याचे फोटो कॅथरिनने टिपले आहेत. प्रथमच मृत्यूला एवढ्या जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे कॅथरीन सांगते. कॅथरीनला गर्भातून बाळ बाहेर येणे आणि जीवनाला निरोप देण्याच्या या प्रवासात अनेक साम्य आढळून आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफर कॅथरीन अर्टमॅनच्या अबाउट डाइंग प्रोजेक्टचे PHOTO