फ्रीलान्स फोटोग्राफर मुई जियाओ यांनी एका फोटोशूटमधून चीनमधील कमी वयातील विवाहीत जोडप्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. चायनीज सोसायटीतील चाइल्ड ब्राइड्स-ग्रूम्सची खरी स्थिती जगासमोर अाणण्यासाठी मुई जियाओ यांनी हे फोटोशूट केले आहे.
युनान प्रॉव्हिन्सच्या ग्रामीण भागातील ही छायाचित्रे आहेत. तिथे जियाओ यांना अशा काही मुली भेटल्या की, त्याचे वय 13 वर्षे होते. त्या इतक्या कमी वयात विवाहीत होत्या. इतकेच नव्हे तर त्या प्रेग्नेटही होत्या.
13 व्या वर्षीच मुलींचे लावून दिले जाते लग्न...- मुई जियाओ यांच्या फोटो सीरीजमध्ये जी या 13 वर्षीय मुलीचा फोटा आहे.
- फक्त तीन दिवसांच्या डेटिंगनंतर तिने 18 वर्षीय वेनशी लग्न केले होते.
- बर्थ कंट्रोलचे नॉलेज नसल्याने ती अवघ्या काही महिन्याच तिला दिवस गेले होते. यामुळे तिला शिक्षण देखील अर्ध्यात सोडावे लागले होते.
- जी व वेन युनान प्रॉव्हिंसच्या तंगिजिबियन येथे राहातात.
- वेनचे आई-वडील घरापासून 1,000 मैल दूर अंतरावर असलेल्या अन्हुई प्रॉव्हिंसमध्ये नोकरी करतात. ते प्रत्येक महिन्याला वेन व जीच्या संसारासाठी पैसे पाठवतात.
- जी घरी अॅम्ब्रॉडरीचे काम करते.
अशीची काहीशी आहे काई व मिंगची कहाणी...
- 16 वर्षीय काई व 17 वर्षीय मिंगची भेट एकवर्षापूर्वी झाली होती.
- तीन महिन्यांच्या डेटिंगनंतर दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. काईने पाचवीतच शाळेला रामराम ठोकला आहे.
कमी वयातच विवाहबद्ध होतात टिनेज कपल्स
- चीनमध्ये महिलेचे विवाहयोग्य वय 20 तर पुरुषाचे 22 वर्षे आहे.
- फोटोग्राफर मुई जियाओच्या मते, अरेंज मॅरिजच्या भीतीने मुली कमी वयातच आवडीच्या मुलांसोबत विवाह करतात.
- कोणतेही प्लॅनिंग न करता त्या प्रेग्नेंटही होऊन जातात. कमी वयात त्यांच्यावर मातृत्त्वाची मोठी जबाबदारी येऊन पडते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चीनमधील टीनेज कपल्स वैवाहिक आयुष्य...