आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या युध्‍दात हजारो लोकांचा गेला जीव, पाहा किती भयावह होती युध्‍दभूमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे अध्‍यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुशने 2003 मध्‍ये 20 मार्च रोजी या युध्‍दाची सुरुवात केली होती. - Divya Marathi
अमेरिकेचे अध्‍यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुशने 2003 मध्‍ये 20 मार्च रोजी या युध्‍दाची सुरुवात केली होती.
इराक युध्‍दात ब्रिटनने आपले लष्‍कर पाठवायला नको होते. 2003 मध्‍ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोन ब्लेअरने कोणताही विचार न करता गुप्तचर अहवालावर सैन्याला इराकमध्‍ये पाठवले. इराक युध्‍द चौकशी समितीचे अध्‍यक्ष जॉन चिकलोटने बुधवारी 'इराक युध्‍दात ब्रिटनची भूमिका' यावरील चौकशी अहवाल सादर केला. यामुळे ब्लेअर यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या युध्‍दात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. यानिमित्त divyamarathi.com तुम्हाला युध्‍दाच्या वेळी कशी परिस्थिती होती याबाबत सांगणार आहे. जबरदस्तीने झाला होता इराकवर हल्ला..

- इराककडे जैविक शस्त्रे असल्याची शंका असल्याने अमेरिकेचे अध्‍यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुशने 2003 मध्‍ये 20 मार्च रोजी युध्‍दाला सुरुवात केली.
- बुश यांना इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसेनला संपवायचे होते.
- त्यांचा आदेश येताच अमेरिकेचे नौदलाने इराकची राजधानी बगदादमध्‍ये क्रूझ मिसाइल्स डागले.
- बगदाद शहर बॉम्ब व हवाई हल्ल्यांचा आवाज ऐकू येऊ लागला.
- 21 दिवसांमध्‍ये अमेरिकेने इराकचे सर्व मोठ्या शहरांवर आपल्या कब्जात घेतले होते.
- मात्र सद्दाम हुसेन आताही अमेरिकेपासून लांब होता.
- 13 डिसेंबर 2003 मध्‍ये सद्दाम हुसेन अमेरिकेच्या हाती लागला.

हजारो लोकांनी जीव गमावला
- अहवालानुसार, इराकमध्‍ये 1 लाख 9 हजार लोक मारली गेली.
- यात 66 हजार 81 नागरिक व 23 हजार 984 बंडखोर सामील होते.
- इराकी लष्‍कराचे 15 हजार 196 व मित्र राष्‍ट्रांचे 3 हजार 771 जवानांना जीव गमवावा लागला.
बुश यांनी मान्य केले, इराक युध्‍द ही माझी सर्वात मोठी चुक
- 2004 मध्‍ये सीआयएचे माजी प्रमुख शस्त्रास्त्रे निरीक्षक डेव्ह‍िड ए के म्हणाले, अमेरिकन गुप्तचर संस्था अयशस्वी ठरली.
- ते इराकच्या जैविक शस्त्रे शोधू शकले नाही.
- यानंतर बुश यांनी स्वत: म्हटले होते, की इराक युध्‍द त्यांची सर्वात मोठ्या चुकांपैकी एक आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कसे झाले युध्‍द...