लंडन - ब्रिटिश शाही कुटुंबाने राजकुमारी शारलॉट एलिजाबेथ डायनाचे अधिकृत फोटो प्रथमच जारी केले आहेत. त्यात राजकुमारी आपल्या 21 महिन्याच्या मोठ्या भावाच्या कुशीत असल्याचे दिसून येत आहे. हे फोटो त्यांची आई केट मिडलटन यांनी काढले आहेत. केट यांना शाही कुटुंबामध्ये डचेस ऑफ कँब्रिजचा दर्जा मिळाला आहे. त्या प्रिन्स विल्यमच्या पत्नी आहेत. हे फोटो जवळपासस दोन आठवडे जुने आहेत. मे महिन्यात शारलॉटचा जन्म झाला होता. राजकुमारी शारलॉटचे स्थान गादी मिळणाऱ्या कुटुंबीयांच्या यादीत चौथे आहे. तिचे नाव "हर रॉयल हायनेस प्रिन्सेस शारलॉट ऑफ कॅम्ब्रिज" असे आहे.
किंग्सटन पॅलेसच्या वतीने करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ''प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्स शारलॉट यांचे हे फोटो घरीच काढण्यात आले आहेत. प्रिंस जॉर्जबरोबर बहिणीचा फोटो शेअर करताना आनंद होत असल्याचेही या ट्वीटमध्ये म्हटले आहे. शाही कुटुंबाने प्रिन्स जॉर्जचेही मोजकेच फोटो शेअर केले आहेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रमातही तो फारसा दिसत नाही. गादीच्या वारसदारांत त्याचा क्रमांक आजोबा प्रिन्स चार्ल्स आणि वडील विल्यम यांच्यानंतर लागतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघांचे आणखी काही PHOTOS