आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे लग्नानंतर अनेक पुरुषांशी संबंध ठेवण्याचे असते स्वातंत्र्य, चालते 'महिला राज'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका फोटोग्राफरने सहाराच्या मरुस्थलमध्ये राहणाऱ्या एका अनोख्या समाजातील लोकांचे फोटो जारी केले आहेत. हे धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या परंपरा या इतर जगापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. येथे महिलांना लग्नानंतरही इतर पुरुषांबरोबर शारिरीक संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य असते. महिला साधारणपणे बुरखा वापरत नाहीत आणि घटस्फोटानंतर सर्व संपत्तीही त्याच ठेऊन घेतात. शेकडो वर्ष जुन्या या जातीला तुआरेग म्हटले जाते. सामान्यपणे जगातील पद्धतीच्या उलट याठिकाणी महिला अधिक निर्णय घेत असतात. म्हणजे येथे 'महिला राज' चालते. याठिकाणी घटस्फोटानंतर पालकांकडून मुलींना पार्टी देण्याचीही पद्धत आहे.

या जमातीतील पुरुष अनेक वेळा चेहरा झाकलेले आढळतात. फोटोग्राफर हेनरीटा बटलर यांनी प्रथम 2001 मध्ये या जमातीतील लोक पाहिली. त्यांनी त्यांच्याबरोबर काही काळ घालवला आणि त्यांच्या जीवनशैलीचे फोटो काढले. हे लोक मुस्लिम धर्माचे असले तरी बहुतांश मुस्लिम समाज त्यांना मान्यता देणार नाही हे स्पष्ट आहे. या परिसरात इस्लामचा वाढता प्रभाव पाहता त्यांच्यावर दबाण आणला जाण्याची शक्यता अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.

येथील महिला लग्नापूर्वी हवे तेवढे बॉयफ्रेंड ठेवता येतात. हे लोक तंबुंमध्ये राहतात, आणि रात्रीच्या वेळी मुले मुलींच्या तंबूत येऊन ते मुलीबरोबर संबंध ठेवतात असे म्हटले जाते. विशेष म्हणजे या दरम्यान कुटुंबातील लोकही त्यांना काही माहिती नसल्याप्रमाणेच वागतात. सकाळी मुले पुन्हा आपल्या तंबूत परततात. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशी मुलगी पुन्हा दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते.

फोटोग्राफर बटलरच्या मते या जमातीचे लोक चांगलेच विनम्र असतात आणि सर्व कामे अत्यंत चतुराईने पूर्ण करतात. याठिकाणी मुली वयाच्या २० व्या वर्षाच्या सुमारास विवाह करतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या जमातीच्या जीवनशैलीचे निवडक PHOTO

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...