ऑरलँडो(अमेरिका) - फ्लोरिडातील 'पल्स' एलजीबीटी नाईट क्लबमध्ये रविवारी(ता.12) झालेल्या गोळीबारात 50 पेक्षा जास्त लोक मारली गेली. तसेच अनेक लोक जखमीही झाले आहेत. हा कट रचणा-याची ओळख पटली असून त्याचे नाव उमर मतीन असे आहे. तो मूळचा अफगाणिस्तानच आहे. उमर स्फोटकांचे जॅकेट परिधान करुन क्लबमध्ये शिरला होता. गोळीबाराच्या या घटनेनंतर घटनास्थळी ठिकठिकाणी गोळ्यांचे व्रण दिसत आहे. दुसरीकडे हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची आश्रू थांबता न थांबेना.
लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या बेपत्ता आप्तेष्टांच्या शोधासाठी हॉस्पिटलमध्ये येत आहेत. 9/11 हल्ल्यानंतर घडलेल्या या मोठ्या दहशतवादी घटनेने अमेरिका हैरान झाली आहे. लोक मृतकांना श्रध्दांजली वाहण्यासाठी रस्त्यांवर उतरत आहेत. या बातमीत तुम्ही त्या एलजीबीटी क्लबचे फोटोज पाहू शकाल, ज्यावर हा हल्ला झाला. पुढील स्लाइड्सवर पाहा, गोळीबारानंतर या क्लबचे फोटोज...