आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जावधी लोकांनी पाहिला असेल हा PHOTO, पण सत्य तुम्हाला माहित नसेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज एक्सपीचा वॉलपेपर.... - Divya Marathi
मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज एक्सपीचा वॉलपेपर....
इंटरनॅशनल डेस्क- हा फोटो पाहून तुम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. कारण, सुमारे 16 वर्षापूर्वी म्हणजे 24 ऑगस्ट, 2001 मध्ये रिलीज झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज एक्सपीवर हा फोटो सर्वप्रथम पाहायला मिळाला होता. मायक्रोसॉफ्टने याला डिफॉल्ट डेस्कटॉप इमेजवर सेट केला होता. याच्यामागे एक रोमांचिक कहाणी आहे, मात्र अनेक वर्षानंतरही या फोटोचे सत्य समोर आले नव्हते. अनेक देशांत चर्चेत राहिला हा फोटो...
 
- ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज Xp वर हा फोटो येताच पॉपुलर झाला होता. अनेक दिवस या फोटोच्या ठिकाणाबाबत कन्फ्यूजन होते.
- सुरुवातीला हा फोटो फ्रान्स, इंग्लंड, स्विर्त्झलंड, न्यूझीलंडमधील नॉर्थ ओटागो, साउथ-वेस्टर्न वॉशिंग्टन आणि जर्मनीतील असल्याचे सांगितले गेले. 
- एवढेच नव्हे तर जर्मनीतील ‘डच लॅंग्वेज एडिशन’ च्या एनसायक्लोपीडियाने तर हा फोटो आर्यलंडचा असल्याचे सांगितले होते.
 
हे आहे फोटोचे सत्य-
 
- हा फोटो अमेरिकेतील फेमस फोटोग्राफर चार्ल्स ओ-रियरने आपल्या कॅमे-यात कैद केला होता. 
- जानेवारी 1996 मध्ये चार्ल्स कशाच्या कामासाठी कॅलिफोर्नियाला चालले होते. या दरम्यान रस्त्यात त्यांना ‘सोनोमा कंट्री’ जवळ हा सुंदर नजारा दिसला. 
- चार्ल्सजवळ त्या वेळी हाय रिजॉल्यूशनचा कॅमेरा नव्हता. मात्र, ते आपल्याजवळ एक छोटा कॅमेरा नेहमी ठेवायचे. याच कॅमे-याने त्यांनी सुंदर नजारा क्लिक केला. चार्ल्सने अशी चार फोटोज काढले होते. 
 
मायक्रोसॉफ्ट कंपनीला लागलीच पसंत पडला होता फोटो-
 
- चार्ल्ससाठी हा फोटोज किरकोळ होता. काही दिवसांनी त्यांनी हे फोटोज बिल गेट्सची इमेज लायसेंसिंग सर्विस ‘कोर्बिस’वर अपलोड केले.
- कंपनीच्या एका अधिका-याची नजर या फोटोजवर पडली आणि त्याला हे फोटो इतके पसंत आले की त्याने हे फोटोज सरळ बिल गेट्स यांच्याजवळ पाठवले. 
- कंपनीच्या अनेक अधिका-यांनी या फोटोजवरून डिस्कशन केले आणि हा फोटो सर्वांना पसंत पडले. 
- यानंतर हे फोटोज खरेदी करण्यासाठी कंपनीने चार्ल्स यांच्याशी संपर्क साधले.  इतक्या मोठ्या कंपनीतून कॉल आल्यानंतर चार्ल्स खूपच खूष झाले आणि ते थेट कॅमेरा घेऊन कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहचले. 
- चार्ल्सच्या या फोटोजबाबत त्यांना मोठी रक्कम दिली गेली. मात्र, चार्ल्सने आतापर्यंत हा खुलासा केला नाही की, ही डील किती रुपयांना झाली होती.
 
नंतर असा कधीच दिसला नाही नजारा-
 
- ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज Xp वर हा फोटो येताच तो जगभर गाजला.
- चार्ल्स यांनी एका चॅनेलला दिलेल्या इंटरव्यूत या फोटोचे लोकेशनचा खुलासा केला होता. 
- यानंतर अनेक लोकांनी ‘सोनोमा कंट्री’ जाऊन असे फोटोज क्लिक करण्याचा प्रयत्न केला मात्र तसा नजारा नंतर कधीच दिसला नाही.
- एवढेच नव्हे तर ‘पीसीवर्ल्ड’ चे सीनियर एडिटर मार्क हॅचमॅनने 8 एप्रिल, 2014 रोजी पब्लिश केलेल्या आपल्या एका आर्टिकलमध्ये लिहले होते की, ते स्वत: तेथे गेले होते, मात्र तसा नजारा पाहायला मिळाला नाही जो चार्ल्सने आपल्या कॅमे-यात कैद केला होता.
- चार्ल्सचे हे नशिबच की, त्यांनी हिरव्या टेकडीवर निळयाशार आभाळाचा सुंदर नजारा पाहिला व तो अचूक टिपला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या फोटोशी संबंधित अन्य रोचक बाबी.....
बातम्या आणखी आहेत...