आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 PHOTO द्वारे जाणून घ्या, गेल्या आठवड्यातील जगभराची खबरबात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुकलिनमध्ये कोनी आयलँडमध्ये मर्मेड परेडसाठी वाट पाहणारी स्पर्धक. - Divya Marathi
ब्रुकलिनमध्ये कोनी आयलँडमध्ये मर्मेड परेडसाठी वाट पाहणारी स्पर्धक.
या महिन्याची सुरुवातच कर्जाच्या गर्तेत असलेल्या ग्रीसमधील आर्थिक संकटापासून झाली. बेलआउट पॅकेजला जनतेने विरोध दर्शवल्याने युरोझोनमधून बाहेर पडण्याचे संकट टळले आहे. तसेच युरोझोनच्या नेत्यांमध्ये ग्रीससाठीच्या तिसऱ्या बेलआऊट पॅकेजवरही एकमत झाले आहे. दुसरीकडे उफामध्ये ब्रिक्स देशांची परिषद झाली. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सहभाग घेतला. याठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यातही भेट झाली. त्याकडे सगळ्या जगाच्या नजरा होत्या.

सिरिया आणि इराकमध्ये ISIS चा धुमाकूळ सुरुच आहे. त्याचवोळी येमेन आणि इजिप्तमध्येही इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हल्ले केल्याचे पाहायला मिळाले. महिन्याच्या सुरुवातीला येमेनमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. मात्र रमजान सुरू झाल्याने गेल्या शुक्रवारी संयुक्त राष्ट्राने शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर हिंसाचार थांबला आहे.

चीनच्या अनेक राज्यांना पूर आणि वादळाचा सामना करावा लागला आहे. जोरदार पावसामुळे अनेकांना घरे सोडावी लागली आहे. तसेच चान-होम वादळामुळे 19 लाख नागरिकांना फटका बसला आहे. तसेच 6000 कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, जगभरात रमजानची झगमग पाहायला मिळाली. तसेच स्पेनमध्ये दरवर्षी होणाऱ्या फर्मिन फेस्टीव्हलमध्ये लोकांनी बुल फाइटचा आनंद घेतला. अशीच जगभरातील खबरबात फोटोंच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाइड्सवर PHOTO द्वारे पाहा, जगभरातील स्थिती...
बातम्या आणखी आहेत...