आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Going Viral Of Dog Saved Newborn Baby Girl Thrown In Dump

पित्याने फेकले मरण्यासाठी, नवजात बाळाचे प्राण वाचवून कुत्रा बनला HERO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करण्यात आला आहे. - Divya Marathi
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करण्यात आला आहे.
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये मुलींचा जन्म होताच त्यांना मरण्यासाठी सोडून दिले जाते. समाजात त्यांना कलंक समजले जाते. कचऱ्यामध्ये फेकलेल्या एका नवजात चिमुरडीचे असेच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिमुरडीचे प्राण वाचवणारा कोणताही माणूस नव्हता तर एक कुत्रा होता. याबाबत दोन कथा शेअर केल्या जात आहेत. त्यापैकी एक घटना दोन वर्षांपूर्वी ब्राझीलच्या एका शहरात घडलेली आहे. हा फोटो शेअर करून यूझर्स एका प्राण्याने दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक करत आहेत.

पित्यानेच फेकले कचऱ्यात...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार या नवजात बालकाला त्याच्या वडिलांनीच कचऱ्यात फेकले होते. त्यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला उभा असलेला कुत्रा हे सर्व पाहत होता.
- हा व्यक्ती गेल्यानंतर कुत्र्याने तोंडात त्या बाळाला उचलले आणि त्याला घेऊन कुत्रा शेजाऱ्याच्या घरी गेला. कुटुंबीयांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी हा कुत्रा ओरडू लागला.
- त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या लोकांनी च्या चिमुरडीला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता ही मुलगी पूर्णपणे सुखरुप आहे.
- वंश वाढवण्यासाठी मुलगा व्हावा या लालसेमुळे लोक एवढ्या खालच्या स्तरावर गेले आहेत की, अशा घटना अनेकदा समोर येत असतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS