आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Air India Staff Behind Airlifts Of Indians From Kuwait

PHOTOS: असे आणले 1990 मध्‍ये कुवेतमधून 1 लाख 7 हजार भारतीयांना मायदेशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गल्फ युध्‍दा दरम्यान अम्मानमध्‍ये एअर इंडियाच्या विमानात चढताना भारतीय. - Divya Marathi
गल्फ युध्‍दा दरम्यान अम्मानमध्‍ये एअर इंडियाच्या विमानात चढताना भारतीय.
गल्फ युध्‍दात अडकलेल्या भारतीयांना सुखरुप मायदेशी नेण्‍यासाठी एक मोहिम आखण्‍यात आली होती. त्यावर 'एअरलिफ्ट' नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. यासाठी अक्षय कुमारचे बरेच कौतूक होत आहे. तसे कुवेतमध्‍ये अडकलेल्या एक लाखांपेक्षा जास्त भारतीयांना मायदेशी सुखरुप पोहोचवण्‍यात अस्सल हिरो एअर इंडियाचे कर्मचारी होते. यापैकी एक होते कॅप्टन विजय नायर. त्यांच्या कुटुंबाने त्यावेळीची छायाचित्रे शेअर केली आहे.
या सर्वात मोठ्या मोहिमेस कसे मिळाले यश?
- एअर इंडियाचे अधिकारी कॅप्टन विजय नायर यांच्या कुटुंबाने या मोहिमेची छायाचित्रे शेअर केली आहे.
- या मोहिमेशी संबंधित एअर इंडियाच्या तीन अधिका-यांपैकी एक होते विजय नायर.
- मायकल मस्कारेनहस त्यावेळी गल्फ आणि पश्चिम आशियात एअर इंडिया एअरलाइन्सचे प्रादेशिक संचालक होते. विजय नायर आणि चार्ल्स मॅन्युएल त्यांचे दोन डेप्युटी होते.
- 1990 मध्‍ये इराकच्या हल्ल्या वेळी कुवेतमध्‍ये 1 लाख 7 हजार भारतीय अडकले होते.
- भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्‍यासाठी तत्कालीन परराष्‍ट्रमंत्री इंद्रजित गुजराल यांनी इराकचे राष्‍ट्राध्‍यक्ष सद्दाम हुसेन यांची भेट घेतली.
- शेजारील देश जॉर्डनच्या मार्गे भारतीयांना बाहेर काढण्‍यास संमती बनली.
एअर इंडियाची घ्‍यावी लागली मदत
- भारतीय दुतावासाच्या अधिका-यांनी खासगी बसने भारतीयांना बसरा आणि बगदाद मार्गे अम्मानला पोहोचवले.
- दररोज 80 बसेस भारतीयांना कुवेतमधून सुरक्षित स्थळी हलवित होते.
- सुरुवातीला भारतीय हवाई दलाच्या विमानांनी भारतीयांना तेथून बाहेर काढण्‍यात आले.
- कागदपत्रांची पुर्ततेत अडचणी आणि मर्यादित वापरामुळे भारताने एअर इंडियाला या मोहिमेत सामील केले.
- 59 दिवसांमध्‍ये अम्मानहून मुंबई दरम्याने एअर इंडियाची 488 विमानांनी उड्डाण घेतले.
- दररोज दहा विमानांनी उड्डाण घेतली. यात एका विमानात 300 प्रवाशांना आणले जात होते.
- सरकारी विमानांच्या मदतीने आखला गेलेला हा सर्वात वेगवान आणि मोठी मोहिम होती.
- या मोहिमेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्‍ये सामील करण्‍याल आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा कुवेतमधील एअरलिफ्ट ऑपरेशनची छायाचित्रे...