आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा जाणून घ्यायचे असतील तर पाहा हे PHOTOS, प्रेसिंडेंट असताना अशी होती Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामांची कारकिर्द संपूर्ण जगासाठीच अत्यंत महत्त्वाची ठरली. नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबरला बराक ओबामांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. आठ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले असतील. पण बराक ओबामा रोज इतरांसाठी असे अविस्मरणीय क्षण तयार करत असत. व्हाइट हाऊसमधील फोटोग्राफर पेटे डिसुझा यांनी ओबामांचे असेच काही फोटो क्लिक केले आहेत. आपले काम करत असतानाच इतरांना खास महत्त्व देणारे ओबामा हे कोणालाही कमी जास्त लेखत नाहीत हे फोटोवरून स्पष्ट होते.

बराक ओबामांच्या व्यक्तीमत्त्वाचा शक्यतो सर्वासमोर न येणारा हा पदर या माध्यमातून डिसुझा यांनी सर्वांसमोर आणला आहे. रोज ओबामांचे फोटो क्लिक करताना आठ वर्षांत डिसुझा यांनी त्यांचे लाखो फोटो क्लिक केले आहेत. त्यापैकी निवडक असे फोटो नुकतेच त्यांनी रिलीज केले आहेत. व्हाइट हाऊसमधील स्वीपरबरोबर हात मिळवताना तर कधी स्टाफमधील कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांबरोबर खेळतानाचे ओबामा सर्वांचे लाडके का होते, हे Photos पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात येईल. चला तर मग एका वेगळ्या व्यक्तीमत्त्वाच्या आजवर समोर न आलेल्या जीवनाच्या सफरीवर.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, बराक ओबामा यांचे असेच काही भन्नाट PHOTOS... 
 
 
बातम्या आणखी आहेत...