आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ParisAttack : जाणून घ्या, फ्रान्समधील मुस्लीमांची डेली LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोग्राफर यूसुफ बौडलाल यांनी पॅरिसमध्ये मुस्लिमांच्या डेली लाईफचे फोटो क्लिक केले. - Divya Marathi
फोटोग्राफर यूसुफ बौडलाल यांनी पॅरिसमध्ये मुस्लिमांच्या डेली लाईफचे फोटो क्लिक केले.
पॅरिस - फ्रान्स हा संपूर्ण युरोपमध्ये सर्वाधिक अल्पसंख्याक असलेला देश समजला जातो. पण काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याने येथे राहणाऱ्या मुस्लीमांचे जीवन पूर्वीप्रमाणे सोपे राहिलेले नाही. येथे राहणारी मुस्लीम कुटुंबे या घटनेनंतर मुलांशी भेदभाव होण्याच्या शक्यतेने घाबरली आहेत. काही पालक तर मुलींचे स्कार्फ पूर्णपणे हटवण्यासाठी दबाव येण्याच्या शक्यतेनेही घाबरलेले आहेत. तसेच शाळेत मुलांना वाईट वागणूक मिळण्याची भितीही त्यांना सतावते आहे.

हल्ल्यानंतर बदलली परिस्थिती
या समस्यांमुळे काही मुस्लीम कुटुंबे त्यांच्या संस्कृतीच्या अधिक जवळही गेली आहेत. पॅरिसच्या सोरबोन विद्यापीठात शिकणाऱ्या सेहमवर या घटनेनंतर मोठ्याप्रमाणावर दबाव आहे. तिच्या आईने तिला कोणत्याही स्थितीमध्ये स्कार्फ काढायचा नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे सेहम जास्तीत जास्त वेळ घरातच राहत आहे. अशा शंकांच्या वातावरणात एका मुस्लीम तरुणाने पॅरिसच्या डी ला रिपब्लिकमध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम असल्याचे सांगत या तरुणाने डोळ्यावर पट्टी बांधली आणि लोकांना विनंती केली की, त्याच्यावर विश्वास असेल तर त्यांनी त्याला मिठी मारून तसे स्पष्ट करावे.

विविध प्रकारचे निर्बंध
फ्रान्समध्ये मुस्लीम लोकसंख्या जास्त असली तरी या देशाला त्यांना आपला भाग मानणे फारच कठीण गेले. पॅरिसच्या मान्टेस-ला-जोलेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहणाऱ्या लाहकेन यांच्या मते फ्रान्समध्ये इस्लामचे पालन करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यांना याठिकाणी असलेल्या कायद्यांबाबत चिंता आहे. कारण येथील मुस्लीमांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी संपूर्ण चेहऱ्यावर नकाब परिधान करण्याची बंदी, या कायद्यामुळे असा इस्लाम तयार झाला आहे, ज्याला फ्रान्स मंजुरी देतो. याठिकाणी राहणाऱ्या 36 वर्षीय चेहरजद यांच्या मते त्यांना येथील नियमांमुळे ऑफिसमध्ये हेडस्कार्फ काढून काम करावे लागते. अशा अनेक निर्बंधांचा सामना त्यांना करावा लागतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफर यूसुफ बौडलाल यांनी घेतेलेले मुस्लीमांच्या डेली लाइफचे PHOTOS