तेहराण - ईराणचे नाव समोर येताच आपल्या डोळ्यासमोर शरिया कायद्याचे कट्टर पालन करणाऱ्या एका मुस्लीम देशाचे चित्र उभे राहते. याठिकाणी लोकांवर चांगलाच दबाव टाकला जातो. खुलेआम मृत्यूदंडाची शिक्षा हे तर रोजचेच झाले आहे. पण एक गट सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणची लोकांच्या मनातील प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. इंस्टाग्रामवर 'everydayiran' पेजवर इराणच्या दौनंदिन जीवनाचे फोटो शेअर केले जातात.
पेजचा फाऊंडर असलेल्या अली कोवेह याने सांगितले की, तो स्वतःच त्याच्या देशातील असे फोटो पाहून थक्क आहे. एका फोटोमध्ये दोन हसणाऱ्या मुलावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या जात आहेत. हे सर्वात धक्कादायक असल्याचे कोवेह म्हणाला. इराणमध्ये अशी परंपरा सुरू झाल्याचे त्याला माहितीच नव्हते. त्याला आणि त्याच्या मित्रांना इन्स्टाग्रामवरील 'EverydayAfrica' या पेजवरून इराणचे पेज सुरू करण्याची आयडिया मिळाली होती.
मुस्लीम क्रांतीने बदलला चेहरा
1979 मध्ये मुस्लीम क्रांतीनंतर इराणचे शाह मोहम्मद रेजा पहलवी यांची सत्तेवरून हकालपट्टी करण्यात आली. शाह यांना सत्तेबरोबरच देशही सोडावा लागला. दुसरीकडे सरकारने बोलावल्यानंतर ईराणचा धार्मिक नेता अयातुल्लाह खोमेनी 14 सालवर्षांनंतर देशात परतले होते. त्यावेळी ते देशातील सर्वात मोठे नेते ठरले होते. त्यांच्या नेतृत्त्वात इराणमध्ये मुस्लीम राज्याची स्थापना झाली. कट्टरतेमुळे इराण पाश्चिमात्य देशांपासून बराच दुरावला गेला.
मुस्लीम क्रांतीपूर्वी मात्र इराणमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव होता. येथे वेशभुषेसंदर्भात किंवा धार्मिक निर्बंधही फार नव्हते. येथील समाज बराच पुरोगामी होता. कला, साहित्याबरोबर चित्रपटांचाही येथे बोलबाला होता. त्यावेळी इराणमधील वेशभुषा पॅरिस किंवा लंडन सारख्या शहरांसारखीच होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा. इराणच्या दैनंदिन जीवनातील PHOTOS