आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लंडनच्या जत्रेत' कोळी नृत्य, परदेशात असे बिनधास्त थिरकले भारतीय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - लंडनच्या गनर्सबरी पार्कमध्ये नुकताच भारतीय वंशाच्या नागरिकांनी महामेला आयोजित केला. या कार्यक्रमात देशी-परदेशी गाण्यांसह कोळी नृत्य सुद्धा सादर करण्यात आले. या फेस्टीव्हलला महामेला असे नाव देण्यात आले होते. त्यामध्ये लंडनचे मेअर सादिक खान सुद्धा उपस्थित होते. 2003 मध्ये सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय जत्रेची सुरुवात झाली. त्यावेळी यात 60 हजारांहून अधिक भारतीय वंशाचे लोक यात सहभागी झाले होते. लंडनमध्ये भरलेला हा सर्वात मोठा फेस्टीव्हल ठरला होता. तेव्हापासूनच दरवर्षी गनर्सबरी पार्कमध्ये या जत्रेचे आयोजन केले जाते. केवळ भारतीयच नव्हे, तर स्थानिक ब्रिटिश नागरिकांचा सुद्धा यात उत्सफूर्त सहभाग असतो. या जत्रेत पाणी-पुरी, आइस गोळा, ऊसाचा रस असे विविध खाद्य आणि पेय उपलब्ध होते.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लंडनच्या जत्रेचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...