आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Drone Photo Contest : आकाशातून टिपलेले काही अवर्णनीय नजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शार्कबरोबर स्विमिंग करताना डायव्हर्सच्या फोटोला पुरस्कार मिळाला. - Divya Marathi
शार्कबरोबर स्विमिंग करताना डायव्हर्सच्या फोटोला पुरस्कार मिळाला.
कॅमेऱ्यामध्ये सौंदर्य टिपणे ही एक अत्यंत सुंदर कला आहे. त्यात जर कॅमेरा ड्रोनवर असेल आणि तुम्ही रिमोट कंट्रोलद्वारे तो नियंत्रित करत असाल तर ते अधिक आव्हानात्मक ठरते. दुस-या आंतरराष्ट्रीय ड्रोन फोटोग्राफी कॉन्टेस्टमध्ये असेच 5000 फोटो पाहायला मिळाले. प्लेस, नेचर आणि ड्रोनीज अशा तीन कॅटेगरीमधून याचे विनर निवडण्यात आले.

फोटो-शेयरिंग साइट ड्रोनेस्टाग्राम आणि नॅशनल जियोग्राफिक एकत्रितपणे ही स्पर्धा घेतात. ब्राझीलमधील एका चर्चच्या फोटोने यावर्षी पुरस्कार पटकावला. रिकार्डो मेटिएलोने हा फोटो काढला आहे. त्याशिवाय इतर कॅटेगरीतही विजेते निवडण्यात आले. विजेत्याची निवड फोटोची थीम आणि त्याच्या वैशिष्ट्यांच्या आधारे करण्यात आली.

ड्रोनेस्टाग्रामचे सीईओ एरिक डुपिन म्हणाले की, ''स्पर्धेसाठी येणाऱ्या फोटोंचा दर्जा पाहून मी थक्क झालो. यात एकापेक्षा एक सरस फोटो आले आहेत. गेल्यावर्षी आम्हाला 2000 फोटोंमधून विजेचे निवडायचे होते. पण यावेळी स्पर्धा अधिक आव्हानात्मक होती. यावेळी 5000 फोटोमधून तीन विजेते निवडण्यात आले. ते म्हणाले की, ही कॉन्टेस्ट नव्याचा शोध घेण्यासाठी आणि एरियल फोटोग्राफी जाणून घेण्याची संधी आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ड्रोन फोटोग्राफी कॉन्टेस्टचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...