आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Liqueur Party In Horse Race Of New Jersey

हॉर्स रेसच्या नावाने श्रीमंतांची Liqueur Party, मनसोक्त दारु प्यायल्या महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चॅरिटी हॉर्स रेसच्या वेळी सुरू असलेले सेलिब्रेशन - Divya Marathi
चॅरिटी हॉर्स रेसच्या वेळी सुरू असलेले सेलिब्रेशन
न्यू जर्सी - हे फोटो अमेरिकेच्या न्यूजर्सीच्या फार हिल्स व्हिलेजमध्ये झालेल्या वार्षिक चैरिटी हॉर्स रेस सेलिब्रेशनचे आहेत. 230 एकरात पसरलेल्या मोरलँड फार्ममध्ये फार हिल्स रेस शनिवारी सकाळी झाली. या इव्हेंटमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. मेन इव्हेंटच्या व्यतिरिक्त त्यांनी अल्कोहोल पार्टीचे सेलिब्रेशनही केले. महिला आणि तरुणींचे गट येथे मोठ्या संख्येने पोहोचले. त्यांनी या पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला.

दरवर्षी याठिकाणी येणाऱ्यांमध्ये हॉर्स रेसपेक्षा येथे होणाऱ्या लिकर पार्टीची अधिक क्रेझ असते. याठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांध्ये तरुणांचे प्रमाणही अधिक असते. गेल्या वर्षीच्या इव्हेंटमध्ये झालेला गोंधळ पाहता आयोजकांनी यावर्षी तिकिटाचे दर वाढवले होते. इव्हेंटमध्ये येणाऱ्यांची संख्या मोजकी असावी यासाठी तसे करण्यात आले होते. मात्र तरीही सुमारे 30 हजारांपेक्षा अधिक जणांनी या इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावर्षीही मद्यपान केल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या अनेकांना पोलिसांनी अटक केले.

फार हिल्स रेसची सुरुवात अॅसेक्स हंटच्या पार्श्वभूमीवर झाली होती. 1870 मध्ये फॉक्स हंटिंग इव्हेंट म्हणून मॉन्टक्लेअरमध्ये तो सुरू करण्यात आला होता. 1950 पासून हॉर्स रेसद्वारे सोमरसेट हेल्थ केअर फाऊंडेशनला अधिक फायदा पोहोचवण्यात येत आहे. हे फाऊंडेशन रॉबर्ट वूड जॉन्सन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलला सहकार्य करते. मदतीच्या स्वरुपात मिळणाऱ्या 18 अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधीच्या माध्यमातून कँसर ट्रिटमेंट सेंटर चालवले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा. हॉर्स रेसदरम्यान झालेल्या लिकर पार्टीचे PHOTOS