आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरकड्यावर उलटे लटकून फोटोशूट, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमध्ये रिअाे दि जानेरिअाेजवळचा पेड्रा डा तारतागुवा डोंगरावर २७ वर्षीय पोलिस अधिकारी लुईस फर्नांडो केंडिया याने समुद्र सपाटीपासून ३०० फूट उंचीवर डोंगरकड्याला उलटे लटकून साहसी फोटोसेशन केले. कोणत्याही सुरक्षा उपकरणांचा वापर न करता लुइसने हे स्टंट सादर केले हे विशेष. या वेळी त्याने केवळ पायाच्या साह्याने संपूर्ण शरीराचे संतुलन पेलले होते. त्याच्या मित्राने फक्त दोरी धरून ठेवली होती व त्यावरून तो खाली गेला. हा स्टंट करताना मलाही खूप भीती वाटली. दाेरी सुटली तर आपण सरळ खाली जाणार, असे वाटले, असे लुईसने सांगितले. पेट्रा तारतागुवा हा डोंगर २७६९ फूट उंच असून तो सर्वाधिक घातक सेल्फी पाॅइंट म्हणून ओळखला जातो.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...