अमेरिकेची न्यूज वेबसाइट वाशिंग्टन पोस्टने बांगलादेशातील सर्वात जुन्या वेश्यालयाची लाइफ कॅमेऱ्यात कैद करुन फोटोजद्वारे सार्वजनिक केली आहे. बांगलादेशातील कांडापार वेश्यालय हे देशातील सर्वात जुने आणि दुसरे सर्वात मोठे वेश्यालय म्हणून ओळखले जाते. जवळपास 200 वर्षे जुने हे वेश्यालय 2014 मध्ये जमीनदोस्त करण्यात आले होते, मात्र आता येथे नव्याने 'कामकाज' सुरु झाले आहे आणि पूर्वीसारखीच चहलपहल पाहायला मिळत आहे.
बांगलादेशात लीगल आहे वेश्या व्यवसाय
बांगलादेश हा मोजक्या अशा मुस्लिम देशांपैकी आहे जिथे वेश्या व्यवसायाला कायदेशीर परवानगी आहे. तंगैल जिल्ह्यातील कांडापार वेश्यालय प्रशासनाने जमीनदोस्त केल्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांच्या (एनजीओ) मदतीने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती आहे की येथील बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांचा जन्म याच ठिकाणी झाला, त्यांचे पालन-पोषण येथेच झाले आणि आता त्या येथेच याच व्यवसायत आहेत. या महिलांना हे देखिल माहित नसते की येथून बाहेर पडून आपण कोणते काम करु शकतो.
काही वर्षानंतर मिळालेले स्वातंत्र्य नको असते येथील महिलांना...
>> अमेरिकन वेबसाइटने लिहिले आहे, की वेश्यालयामध्ये त्यांचे स्वतःचे पॉवर स्ट्रक्चर आहे. त्यांचे नियम तेच तयार करतात.
>> येथे नव्याने येणाऱ्या महिलेला पहिली पाच वर्षे आपली कमाई येथील प्रमुखाकडे जमा करावी लागते.
>> येथे येणाऱ्यांपैकी बऱ्याच मुली या ह्युमन ट्रॅफिकिंगच्या शिकार झालेल्या असतात.
>> मुलींनी काही वर्षे नियमीत पैसे जमा केल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर त्या वेश्यालयाच्या बाहेर जाऊ शकतात. एखाद्या कस्टमरला 'नाही' म्हणून शकतात.
>> मात्र हे स्वातंत्र मिळाले असले तरी येथे आल्यानंतर मुली बाहेर जाण्यापासून स्वतःला रोखतात आणि पुढील आयुष्य वेश्यालयातच घालवण्याला अधिक पसंती देतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा,
>> बांगलादेशातली सर्वात मोठ्या वेश्यालयाचे आतील फोटो...
>> कशी असते वेश्यालयाच्या आतील LIFE
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)