आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्दाम हुसेनच्या मृत्यूनंतर काय झाले त्याच्या महागड्या कारचे, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : उदय सद्दाम हुसेनच्या कारसह अमेरिकेचे सैनिक. - Divya Marathi
फाइल फोटो : उदय सद्दाम हुसेनच्या कारसह अमेरिकेचे सैनिक.
इराकचा माजी क्रूर हुकूमशहा सद्दाम हुसैन त्याच्या क्रौर्याबरोबरच लक्झरी लाइफस्टाइलसाठीही प्रसिद्ध होता. त्याचा मोठा मुलगा उदय तर महागड्या लक्झरी कारचा मोठा शौकिन होता. तसेच त्याला एअरक्राफ्ट, गन आणि ज्वेलरीचीही आवड होता. त्याच्याकडे कार आणि गनचे मोठे कलेक्शन होते.

फरारीचे वेड
इराकमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सद्दामच्या राज्याचा अंत झाला. त्यात त्याच्या मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. उदयकडे अनेक कार्सचे मोठे कलेक्शन होते. त्यात फरारीचे एफ-40 मॉडेल उदय हुसेनच्या आवडीच्या कार्सपैकी एक होते. त्याचे ट्विन टर्बो व्ही-8 इंजिन, केवळ 4.5 सेकंदात ताशी 60 मैलाचा वेग घेऊ शकत होते. त्याचा जास्तीत जास्त वेग ताशी 201 मैल एवढा होता. पण त्याच्या या महागड्या कार सध्या भंगारमध्ये पडून आहेत.
मोसूलमध्ये मारले गेले दोघे भाऊ
इराकवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर उदय आणि त्याचा भाऊ कुशय यांना मोसूलमध्ये मारण्यात आले होते. त्याच्या काही महागड्या कारचे कलेक्शन आम्ही तुम्हाला याठिकाणी दाखवणार आहोत. या कार एकेकाली सद्दाम आणि उदय हुसेन यांच्या मालमत्तचे प्रतिक होते.

कलेक्शनमध्ये असलेल्या कार
सद्दाम हुसेनच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे जवान जेव्हा त्याच्या महालात पोहोचले तेव्हा ते त्याठिकाणी असलेल्या गाड्या पाहून दंग झाले. सद्दामचा मुलगा उदयच्या गॅरेजमध्ये पोर्शे 911, फरारी F40, निस्सान 370Z निस्मो, बीएमडब्ल्यू Z1, लेम्बोर्गिनी LM002 या कार होत्या. इराकच्या बहुतांश लोकांना या कारबाबत माहिती नव्हती. बीएमडब्ल्यू Z1 च्या तर जगात केवळ 8000 कार तयार कऱण्यात आल्या होत्या.

( 13 डिसेंबर 2003 ला सद्दाम हुसेनला तिकरित जवळ एका बंकरमधून अटक करण्यात आली होती. दीर्घकाळ चाललेल्या ट्रायलनंतर 5 नोव्हेंबर 2006 रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्याचवर्षी 30 डिसेंबरला त्याला ही सजा-ए-मौत देण्यात आली होती.)
पुढील स्लाइड्सवर पाहा, भंगारात पडलेल्या सद्दामच्या कार आणि बंदुकांचे काही PHOTOS...